आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmers Seek Rs 5 Lakh Loan From Govt At 4% Interest

शेतकऱ्यांना 4% व्याजाने कर्ज द्या; केंद्र सरकारकडे मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सर्वशेतकऱ्यांना लाखांपर्यंतचे कर्ज 4 % व्याज दराने द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांच्या गटांनी तसेच कृषी तज्ज्ञांनी सोमवारी केंद्र सरकारकडे केली. वाढीव हमी भाव द्यावा, पीक विम्याचे कवच वाढवावे आणि निर्यात धोरणात सातत्य असावे, अशाही मागण्या करण्यात आल्या.

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी कृषी क्षेत्रांशी संबंधितांशी अर्थसंकल्पपूर्व चर्चा सुरू केली. त्या वेळी या मागण्या करण्यात आल्या. सध्या शेतकऱ्यांना 7 % व्याज दराने लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. वेळीच कर्जफेड केल्यास सरकार व्याजात 3% एवढी सूट देते. कृषी क्षेत्राला सध्या विविध समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे या क्षेत्राला सर्वाधिक महत्त्व देण्याचे आश्वासन अर्थमंत्र्यांनी बैठकीत दिले.

भाजपच्या जाहीरनाम्यातील आश्वासनानुसार उत्पादन खर्च अधिक ५० % नफा मिळून किमान आधारभूत दर निश्चित करावा तसेच हप्त्यावर अनुदान देऊन सर्व शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा, अशी मागणी भारतीय कृषी संघटनेने केली. युरियाची सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी खत उद्योगांच्या संघटनेने केली. कृषी क्षेत्रासाठी जास्त अर्थसंकल्पीय तरतूद करावी, मंजूर रकमेच्या 4 % निधी कृशी संशोधनावर खर्च करावा, सिंचन सुविधांसाठी जास्त निधी द्यावा आणि साखर विकास मंडळ स्थापन करावे, अशा सूचनाही करण्यात आल्या. बैठकीला खासदार राजू शेट्टी यांच्यासह देशभराती कृषी क्षेत्राशी संबंधित संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.