आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू काश्मिरला वाचवण्यासाठी तत्काळ राष्ट्रपती राजवट लागू करा; अब्दुल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर  - देशातील जातीय तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट तातडीने लागू करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आणि खासदार फारुक अब्दुल्ला यांनी केली आहे. आम्ही राष्ट्रपती राजवटीचे कधीच पुरस्कर्ते नव्हतो, त्यास कायम विरोधच केला आहे; पण त्याशिवाय दुसरा मार्ग नाही, असे त्यांनी पीटीआयला सांगितले.  
 
नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुक अब्दुल्ला यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेसाठी बोलावले होते. राज्यात शांतता हवी आहे, असे मोदींनी सांगितले. पंतप्रधानांशी काेणत्या विषयावर चर्चा झाली याचा तपशील सांगणार नाही, असे सांगून ते म्हणाले, राज्यातील अशांत परिस्थितीवर आमचे बोलणे झाले. हा तणाव संपायला हवा असे त्यांना वाटते, असे अब्दुल्ला यांनी म्हटले. मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला सर्व आघाड्यांवर अपयश आलेले आहे.  केवळ दक्षिण काश्मीरचा भाग नव्हे तर  खोऱ्यात सर्वत्र हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. यामुळे देशात जातीय तणाव वाढत आहे. भाजपच्या काही नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्ये टाळावीत, असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधानांना शांतता हवी आहे; त्यामुळे इतरांनीही त्यांचे ऐकले पाहिजे, असे फारूक अब्दुल्ला म्हणाले. 
 
भाजपला दूर ठेवणे हाच पर्याय
काश्मीरमधील अशांतता निपटण्याचा काही मार्ग नाही काय, असे विचारले असता ते म्हणाले, ९० च्या दशकातील दहशतवादी कारवायांचे स्वरूप आजच्यापेक्षा वेगळे होते. आताची चळवळ वेगळी आहे. कारण पीडीपीचे तत्कालीन नेते मुफ्ती महंमद यांनी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे खोटे आश्वासन निवडणुकीत दिले होते. दुर्दैवाने त्यांनी या पक्षाशी सत्तेसाठी जुळवून घेतले. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...