आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ताब्यात घ्यायला पीओके तुमच्या बापाचा आहे का? फारुक अब्दुल्ला यांचे वादग्रस्त वक्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत(पीओके) वादग्रस्त वक्तव्य केले. पीओके सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहे. मात्र पाककडून पीओके हिसकावून घेण्याचा भारतात दम नाही. शिवाय भारताकडून जम्मू व काश्मीर परत घेण्यात पाकिस्तानमध्येही तेवढे धाडस नाही,असे अब्दुल्ला यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिलेल्या इशाऱ्यानंतर दोन तासांत फारूक अब्दुल्ला यांनी वरील विधान केले. त्याआधी मोदी यांनी पंजाबमधील सभेत म्हटले की, पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पाक भारताशी लढून स्वत:चेच नुकसान करत आहे.

अब्दुल्ला यांनी किश्तवाडमध्ये म्हटले की, पीओके भारताची वैयक्तिक मालमत्ता नाही. त्यामुळे ते वडिलोपार्जित संपत्तीप्रमाणे हक्क करू शकत नाहीत. हे काय तुमच्या बापाचे आहे? पीओकेच्या मुद्द्यावर पाकिस्तानही एक पक्ष आहे,हे भारतानेच मान्य केले आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी पाकिस्तानसोबतच्या चर्चेशिवाय भारताकडे अन्य पर्याय नाही. युद्ध यावरचा उपाय ठरू शकत नाही.

पुढे वाचा, तणावाने यूएन चिंतित...
बातम्या आणखी आहेत...