आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Farooq Abdullah Said Is The Nation Concerned About Stonepelters And Their Future

दगडफेक करणारे सगळेच एकसारखे नाहीत, सरकारच पैसा देत असेल, फारुख अब्दुल्ला यांचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गडफेक करण्यासाठी सरकारच पैसे देत असेल असा आरोप सुद्धा अब्दुल्ला यांनी लावला. (फाईल) - Divya Marathi
गडफेक करण्यासाठी सरकारच पैसे देत असेल असा आरोप सुद्धा अब्दुल्ला यांनी लावला. (फाईल)
जम्मू - नॅशनल कॉन्फ्रेंसचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा काश्मीरात दगडफेक करणाऱ्यांचा पक्ष घेतला. दगडफेक करणारे सगळेच एकसारखे नसतात. सरकारला त्यांच्या भवितव्याची चिंता तरी आहे का? असा सवाल करताना त्यांना दगडफेक करण्यासाठी सरकारच पैसे देत असेल असा आरोप सुद्धा अब्दुल्ला यांनी लावला. काश्मीरात सुरक्षा रक्षकांवर दगडफेक करणारे एक व्यवसाय बनला असून त्यावर विविध स्तरावरून सवाल उपस्थित केले जात आहेत.
 
तुम्ही फक्त देशाचाच विचार करता
- ज्येष्ठ नेते फारुख अब्दुल्ला यांनी बैसाखीवर आयोजित एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. यावेळी पत्रकारांनी त्यांना दगडफेक करणाऱ्यांचे समर्थन करून मते मिळविण्याच्या प्रयत्न करण्यासंदर्भात प्रश्न विचारले. यावर माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला भडकले. "देशाच्या भावनांशी तुमचा अर्थ नेमका काय आहे? खरे पाहता तुम्हाला दगडफेक करणाऱ्या मुलांच्याही काही तक्रारी आहेत. तुम्हाला वाटत नाही का की त्यांच्याही तक्रारी असू शकतात. त्यांनाही भावना असू शकतात. तुम्ही फक्त देशाचा विचार करता, देशाला दगडफेक करणाऱ्यांची आणि त्यांच्या भवितव्याची चिंता नाही का?"
 
सरकारच पैसे देत असेल
- फारुख अब्दुल्ला यांना त्यांच्या मागील वक्तव्यावर सुद्धा पत्रकारांनी विविध प्रश्न केले. यापूर्वी त्यांनी "दगडफेक करणारे आपल्या देशासाठी दगडफेक करत आहेत" असे विधान केले होते. यावर ते म्हणाले, "सीआरपीएफ आणि सुरक्षा रक्षकांवर दगडफेक करणारे सगळेच एकसारखे नाहीत. आपल्याला त्यांच्या परिस्थितीवर गांभीर्याने विचार करायला हवा. काही दगडफेक करणाऱ्यांना सरकारकडून पैसा मिळत असेल याची शक्यता नकारता येणार नाही. लोकांनी मतदान करण्यासाठी घराबाहेर पडूच नये म्हणून ते दगडफेक करत असतील. त्यामुळे, सर्वांना एकाच रंगात रंगवू नका असेही ते पुढे म्हणाले. 
 
सीआरपीएफच्या अपमानाचा निषेध
- काश्मीरात सीआरपीएफ जवान रस्त्यारून शांतपणे जात असताना त्यांना काही काश्मीरी युवक चापट मारून त्यांचा अपमान करत असल्याचा व्हिडीओ गुरुवारपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या घटनेचा फारुख अब्दुल्ला यांनी निषेध केला. एवढेच नव्हे, तर युवकांकडून अपमान होत असतानाही मागे वळून सुद्धा न पाहणाऱ्या सीआरपीएफ जवानांच्या सहिष्णुता आणि संयमाचे त्यांनी तोंडभर कौतुक केले. 
 
कोण आहेत दगडफेक करणारे
- काश्मीरी युवकांकडून सुरक्षा रक्षकांवर होणाऱ्या दगडफेकीवर देशभर संताप व्यक्त केला जात आहे. लष्कर, निमलष्करी जवान आणि पोलिसांसह सरकारी वाहनांवर दगडफेक करणाऱ्या युवकांना इंटरनेटवरून हायर केले जात आहे. यांना दरमहा 5 ते 7 हजार रुपये मानधन सुद्धा दिले जाते. यात 12 वर्षांच्या मुलाला सुद्धा 4 हजार रुपयांपर्यंत दिले जातात. 
- शुक्रवारच्या नमाजच्या दिवशी निदर्शनांसाठी 1000 आणि इतर दिवशी दगडफेक करण्यासाठी 700 रुपयांपर्यंत या युवकांना मिळतात. केवळ निदर्शनांसाठीच नव्हे, तर दहशतवाद्यांना पसार होण्यात मदत करण्यासाठी सुद्धा दगडफेक केली जाते. यासाठी सोशल मीडियावर माहिती शेयर केली जाते. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...