फरिदाबाद (हरियाणा)- फॅशन डिझायनर असणाऱ्या शिरीनने 10 जून रोजी म्हैसुर येथे झालेली एलीट मिसेस इंडिया-2017 ही सौदर्य स्पर्धा जिंकली आहे. शिरीन ही एका डॉक्टर कुटुंबातील असून तिचे कुटुंबियांची तिनेही डॉक्टर व्हावे अशी इच्छा बाळगली होती. तिचे स्वप्न काही वेगळेच असल्याने तिने शिक्षणाबरोबरच आपले स्वप्नही जीवंत ठेवले. याच दरम्यान तिचे लग्नही झाले. तरीही तिने आपले स्वप्न कायम ठेवले.
वडिलांनी दिला होता दुसऱ्या क्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला
- शिरीन ही सुप्रसिध्द सर्जन डॉ. नरेंद्र घई व डॉ. मीनाक्षी यांची मुलगी आहे. त्यांची मोठी मुलगी देखील डॉक्टर आहे. शिरीनची मात्र वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा होती. फॅशनमध्ये करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या शिरीनने आपल्या घरातच कॅटवॉकची प्रॅक्टीस केली.
- तिने आपली फॅशन क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आपल्या वडिलांना सांगितली असता त्यांना याचे आश्चर्य वाटले. त्यांनी तिला अन्य क्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला दिला. आपल्या वडिलांच्या सल्ल्याचा मान राखत तिने आपले शिक्षण चालु ठेवले. आपले फॅशन डिझायनर बनण्याचे स्वप्न मात्र तिने कायम ठेवले.
- शिक्षण पुर्ण झाल्यानंतर शिरीनचे लग्न उद्योगपती सनप्रीत सिंह यांच्यासोबत झाले. लग्नानंतर शिरीनने फॅशन स्टोअर सुरु केले. याच दरम्यान तिला मिसेस फरीदाबाद-2017 या स्पर्धेविषयी माहिती मिळाली.
पती आणि कुटुंबियांनी दिला सपोर्ट
- पाच वर्षाच्या मुलाची आई असणाऱ्या शिरीनला पती आणि तिच्या कुटुंबियांनी पुर्ण सपोर्ट दिला. मिसेस फरीदाबाद-2017 या स्पर्धेत तिने पहिल्या तीन विजेत्यांमध्ये स्थान पटकावले. त्यामुळे शिरीनला थेट एलीट मिसेस इंडिया-2017 स्पर्धेत प्रवेश मिळाला. या स्पर्धेत तिने एलीट मिसेस इंडिया-2017 हा किताब पटकावला.
- शिरीनने 21 ने 35 वयोगटातील 25 महिलांना मागे टाकत हा किताब पटकावला. हा किताब पटकविल्यानंतर डॉ. घई यांनी आपल्याला आपल्या मुलीचा अभिमान असल्याचे म्हटले आहे.
- आपल्या मुलांना ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्रात त्यांना करिअर करु द्यावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
स्लाईडमध्ये पाहा या सौदर्यवतीच्या मनमोहक अदा