आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक स्वप्न उराशी बाळगून होती ही तरुणी, Breakup नंतर बॉयफ्रेंडने केले असे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - प्रेम, मौजमस्ती आणि काही दिवसानंतर ब्रेकअप. राजस्थानच्या राजधानीतील एका फॅशन डिझायनरचे डान्स ट्रेनरसोबतचे संबंध येथेच थांबले नाही तर ते अशा वळणावर जाऊन संपले ज्याला डेड एंड म्हणता येईल. मृत्यू. ब्रेकअपनंतर डान्स ट्रेनरने मुलीला एका दुसऱ्या मुलासोबत पाहिले आणि काही तासांतच एक्स गर्लफ्रेंडची हत्या केली.

काय आहे प्रकरण
- 22 वर्षांची हर्षिता गुप्ता एका फॅशन डिझायनर फर्ममध्ये काम करत होती.
- कामासोबतच हर्षिता आयसीजी कॉलेजमध्ये फॅशन डिझायनिंगमध्ये एमएसस्सी करत होती.
- तिने नुकत्याच झालेल्या तिच्या वाढदिवसासाठी स्वतः डिझाइन केलेला पिंक गाऊन परिधान केला होता. त्याचे फोटो फेसबुकवरही शेअर केले होते.
- दिसायला सुंदर असलेली हर्षिता फ्रेंडससोबतही हसून-खेळून राहात होती.
- तिचा चेहरा नेहमी हसतमुख असायचा, असे तिचे क्लासमेट सांगतात.

डान्स ट्रेनर होता मुलगा
- हर्षिता गुप्ताचा हत्यारा जयंत सोढानी डान्स ट्रेनर आहे.
- जयंत पारिख कॉलेजमध्ये बी.कॉम करतो, त्यासोबतच ते सीएसची तयारी करत होता.
- सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहायलाही त्याला खूप आवडते. त्याने फ्रेंडशिप, प्रेम-धोका याबद्दल अनेक प्रकारच्या पोस्ट टाकलेल्या होत्या.
- रिलेशनशिपबद्दलची त्याने एक लांबलचक पोस्टही एफबीवर टाकली होती.

जूनमध्ये झाला होता ब्रेकअप
- हर्षिताच्या मर्डरकेसमध्ये पोलिसांनी जयंतला अटक केली आहे. पोलिस चौकशीत त्याने सांगितले, 'हर्षिता आणि त्याची रिलेशनशिप तीन वर्षांपासून सुरु होती. यावर्षी जूनमध्ये त्यांचा ब्रेकअप झाला होता. जयंतला शंका होती की तिचे दुसऱ्या कोणासोबत चक्कर चालू आहे.'
- ब्रेकअप झाल्यापासून त्याच्या डोक्यात तिचा बदला घेण्याचे घोळत होते. बुधवारी हर्षिता जेव्हा घरातून निघाली तेव्हा जयंतने तिचा पाठलाग सुरु केला.
- एका रेस्तराँमध्ये हर्षिता एका युवकाला भेटल्यानंतर त्याचा संशय आणखी बळावला.
- जयंतने हर्षिताला त्याच्या कारमध्ये बसण्यास सांगितले आणि निर्जणस्थळी तिला घेऊन गेला. तिथे त्याने तिची, डोके आणि चेहऱ्यावर चाकूने अनेक वार करुन हत्या केली.
पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समधून समजून घ्या दोघांचे संबंध...
बातम्या आणखी आहेत...