आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय वा पाश्चिमात्य ड्रेससाठी ऑरेंज अन् ग्रे रंगाला द्या पसंती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेझा यांनी करिना कपूरसाठी बिग स्टार एंटरटेन्मेंट अवॉर्ड्स आणि स्टार गिल्ड अवॉर्ड्ससारख्या मोठमोठय़ा कार्यक्रमांमध्ये आउटफिट तयार केले आहेत. त्यांच्या एका जवळच्या मित्राने ही माहिती दिली आहे. त्यांची एक मैत्रीण बॉलीवूडशी संबंधित आहे. रेझा यांनी काही दिवसांपूर्वी अरोरा खानसाठी ड्रेस डिझाइन केले होते. रेझा सांगतात की, करिना कपूरसाठी ड्रेस तयार करणे किंवा तिच्यासोबत काम करणे, हे एखाद्या सुंदर स्वप्नांसारखे होते. ती प्रत्येक ड्रेस स्टाइलपूर्वक वापरते. करिनाला पारंपरिक महाराष्ट्रीय ड्रेसमध्ये पाहण्याची त्यांची इच्छा होती. करिना फ्लेमिंग ऑरेंज कलरमध्ये सुंदर दिसते. हा रंग तिच्यावर खुलून दिसेल यावर त्यांचा विश्वास आहे. तसेच आइसी ग्रे हा आणखी एक रंग तिच्या व्यक्तिमत्त्वाशी मिळताजुळता आहे.
कलर आणि ड्रेस पॅटर्नपेक्षा टेक्सचर जास्त महत्त्वाचे होते. नेट, जॉर्जेट, ब्रोकेड आणि सिक्वेन्स ओरिएंटेड फॅब्रिकचा वापर करण्यात आला. एम्ब्रॉयडरी आणि एम्बॅलिशमेंटसाठी लहान-मोठय़ा आकाराचे स्टोन्स, डायमंड्स, कुंदन आणि सलमाच्या चांदण्यांमुळे करिनाला स्टनिंग लूक मिळाला.
इंडियन आणि फ्यूजन लूक एकदम वेगळा पाहिजे. ब्लॅक एम्ब्रॉयडरी चोली दोन्ही लुक्सनुसार परफेक्ट होती. पहिल्या भागात करिनाने ब्लॅक चोलीवर डीप फुशिया लहंगा परिधान केला. त्यामुळे परफेक्ट इंडियन टच मिळाला. पाश्चिमात्य/फ्यूजन लूकसाठी लहंग्यावर ब्लॅक असेमिट्रिकल फ्लेअर्ड स्कर्ट परिधान केला.
रेझा शरिफी सांगतात, करिनाची स्टाइल आणि तिने उत्साहपूर्वक केलेल्या परिवर्तनामुळेच आज तिने कोट्यवधी लोकांची मने जिंकली आहेत. त्यामुळेच तिला अनेक पुरस्कार वितरण समारंभात डान्स परफॉर्मन्ससाठी बोलावले जाते. बिग स्टार एंटरटेन्मेंट अवॉर्ड्समध्ये तिने प्रेक्षकांना थक्क केले होते. रेनो स्टार गिल्ड अवॉर्ड्समध्येही तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.
रेझा सांगतात, स्टार गिल्ड अवॉर्ड्सचा ड्रेस डिझाइन करण्यासाठी आली तेव्हा करिना आणि त्यांची पहिली भेट झाली. तिच्या नुकत्याच प्रदश्रित झालेल्या चित्रपटांमधील गाणी ती सादर करणार होती. या सगळ्या गाण्यांवर आधारित असा तिचा लूक करायचा होता. त्यामुळे तिला दोन लूक देण्यात आले होते. पहिल्या भागात इंडियन लूक आणि दुसर्‍या भागात फ्यूजन लूक.