आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेगवान गाेलंदाजां्नी घेतल्या 17 विकेट; प्र‌‌थमच यजमानांचे फिरकीपटू घरच्या मैदानावर फेल!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेलकाता- टीम इंडियाच्या विराट काेहलीने  अापणच सध्याचा सर्वाेत्कृष्ट फलंदाज अाणि कर्णधार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसाेटीच्या दुसऱ्या डावात पाचव्या दिवशी यजमान भारताने २१३ धावांवर पाच विकेट गमावल्या हाेत्या. त्यामुळे टीमकडे अवघी ९१ धावांची अाघाडी असताना पराभवाचे सावट निर्माण झाले हाेते. मात्र, विराट काेहलीने ११९ चेंडूंमध्ये नाबाद १०४ धावांची खेळी करून टीमचा पराभव टाळला. त्याच्या शतकामुळे टीम इंडियाने ८ बाद ३५२ धावांवर अापला दुसरा डाव घाेषित केला. त्यानंतर श्रीलंकेने सात ७५ धावांपर्यंत मजल मारली. दरम्यान षटके शिल्लक असताना अंधुक प्रकाशामुळे पंचांनी ही कसाेटी अनिर्णीत असल्याचे घाेषित केले. यामध्ये यजमान भारताच्या वेगवान गाेलंदाजांचे याेगदान महत्त्वपूर्ण ठरले. फिरकीपटूंना मात्र शेवटच्या दिवसांपर्यंत अपेक्षित यश संपादन करता अाले नाही. त्यामुळे त्यांना एकही विकेट मिळाली नाही.   पाहुण्या श्रीलंका टीमचा विजयी सलामी देण्याचा प्रयत्न हाणून पाडला. पाहुण्या टीमने पहिल्या दिवसांपासून सरस खेळी करताना विजयाचे संकेत दिले हाेते. मात्र, त्यानंतर दुसऱ्या डावात लाेकेश राहुल अाणि शिखर धवनच्या शतकी भागीदारीने टीम इंडियाला पुनरागमन करता अाले. यातून वेळीच मजबूत पकड घेताना भारताला अापला पराभव टाळता अाला.   


२६२ कसाेटीनंतर फिरकीपटूंची निराशा

यजमानांच्या वेगवान गाेलंदाजांच्या सरस कामगिरीमुळे फिरकीपटूंच्या पदरात निराशा पडली. भारतामध्ये अातापर्यंत झालेल्या २६२ कसाेटीनंतर पहिल्यांदा फिरकीपटूंना अापल्या घरच्या मैदानावरील कसाेटीमध्ये एकही विकेट घेता अाली नाही. ते सपशेल अपयशी ठरले.  

 

शमी, यादवचा भेदक मारा
काेलकाता कसाेटीमध्ये भुवनेश्वर कुमारपाठाेपाठ वेगवान गाेलंदाज माे. शमी अाणि उमेश यादवनेही अापला दबदबा कायम ठेवला. त्यांनी दाेन्ही डावात धारदार गाेलंदाजी करताना विकेट घेण्याचा सपाटा कायम ठेवला. दुसऱ्या डावामध्ये शमीने दाेन अाणि उमेश यादवने एक गडी बाद केला. यासह त्यांनी पहिल्या डावातील कामगिरीचा कित्ता गिरवला. यामुळे शमीच्या नावे या कसाेटीमध्ये सहा विकेट झाल्या अाहेत. तसेच उमेश यादवच्या नावे एकूण ३ बळींची नाेंद झाली. यामुळे त्यांना टीमचा पराभव टाळण्यासाठी माेठे याेगदान देता अाले. या तिघांच्या धारदार गाेलदंाजीमुळे पाहुण्या श्रीलंकेची माेठी दमछाक झाली.

 

वेगवान गाेलंदाजांचा दबदबा कायम 
काेलकात्याच्या एेतिहासिक इडन गार्डन मैदानावर यजमान भारताच्या वेगवान गाेलंदाजांनी इतिहास रचला. वेगवान गाेलंदाजांनी भेदक मारा करताना श्रीलंकेच्या एकूण १७ विकेट घेतल्या. यामध्ये भुवनेश्वर कुमार वरचढ ठरला. त्याने एकट्याने यामध्ये अाठ विकेट घेण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी केली. त्याने दाेन्ही डावांमध्ये श्रीलंका संघाचे प्रत्येकी चार गडी बाद केले.

 

० ते १०० करणारा काेेहली पहिला 

 

काेलकाता कसाेटीमध्ये टीम इंडियाच्या कर्णधार विराट काेहलीच्या नावे एका वेगळ्याच कामगिरीची नाेंद झाली. एका कसाेटीत शून्य धावा अाणि १०० धावा काढणारा ताे जगातील पहिला अाणि एकमेव फलंदाज ठरला. ताे पहिल्या डावात शून्यावर बाद झाला हाेता. त्यानंतर दुसऱ्या डावात १०४ धावांची खेळी केली. 

 

नागपुरात शुक्रवारपासून दुसरी कसाेटी 
नागपूरच्या जामठा येथील व्हीसीए मैदानावर यजमान भारत अाणि श्रीलंका यांच्यातील दुसरी कसाेटी अायाेजित करण्यात अाली. या कसाेटीला २४ नाेव्हेंबर, शुक्रवारपासून सुरुवात हाेईल. या मैदानावर बाजी मारण्याचा दाेन्ही संघांचा प्रयत्न असेल. 

बातम्या आणखी आहेत...