आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fate Of 418 Liquor Bars In Kerala To Be Decided Today

केरळमध्ये दारूबंदीची तयारी, पुढील वर्षापासून बारचे परवाने होणार रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थिरुवनंतपूरम - केरळ सरकारने पुढील वर्षापासून राज्यात दारू बंदीचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षापासून केरळमधील मद्य शौकिनांना फक्त पंचतारांकित हॉटेलमध्येच दारू मिळणार आहे. तसेच प्रत्येक रविवार 'ड्राय डे' घोषित करण्याचीही तयारी राज्यातील काँग्रेस प्रणित यूडीएफ सरकारने केली आहे.
केरळमधील मद्यशौकिनांना पुढील वर्षापासून राज्यात मद्यपान करता येणार नाही. मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी 31 मार्च 2015 नवीन बारला परवान मिळणार नसल्याचे जाहीर करतानाच सध्याच्या 312 बारचा परवाना नुतनीकरण होणार नसल्याचे जाहीर केले आहे.

1 एप्रिल 2015 पासून राज्यात फक्त पंच तारांकित हॉटेललाच बारचा परवाना दिला जाणार आहे. याचाच अर्थ चार आणि तीन तारांकित हॉटेलचे मद्य परवाने आपोआप रद्द होतील. याआधी राज्य सरकार एवढ्या मोठ्या संख्येने असलेले बार तत्काळ प्रभावाने बंद केले जाऊ शकतात का, या विषयी कायदेशीर सल्ला घेणार आहे.
या निर्णयाची घोषणा करताना मुख्यमंत्री ओमन चंडी म्हणाले, ' राज्य सरकार लवकरच मद्याविषयीचे धोरण सादर करेल. त्यात राज्यात दारूबंदी कशी लागू करायची हे स्पष्ट केले जाईल.' यूडीएफच्या सर्व घटक पक्षांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. आता मंत्रिमंडळाचा शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात 418 बार मालक हायकोर्टात गेले आहेत. राज्य सरकार त्यांच्या निर्णयाची माहिती कोर्टाला देणार आहे. त्यावर 26 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
दारूबंदीशिवाय यूडीएफ सरकारने पुढील दहा वर्षांमध्ये राज्यातील सर्व पेय पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी 10 टक्के या प्रमाणात विक्रीकेंद्र बंद करुन दहा वर्षांत पूर्णपणे विक्री बंद केली जाणार आहे. सरकारने अशा केंद्रांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी पुनर्वसन पॅकेज देखील जाहीर केले आहे.