आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fatehabad SP Sangeeta Debate Between Kalia And Health Minister Anil Vij

हरियाणाच्‍या मंत्र्यांशी वाद झाल्यानंतर महिला एसपीची बदली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांच्याशी वाद झाल्यानंतर फतेहाबादच्या पोलिस अधीक्षक संगीता रानी कालिया यांची शनिवारी तातडीने बदली करण्यात आली.
राज्यात अमली पदार्थांच्या विक्रीवरून मंत्री अनिल विज यांनी शुक्रवारी बैठकीत, ‘पोलिस काय करत आहेत,’ असा प्रश्न संगीता यांना विचारला होता. त्यावर संगीता यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने विज यांनी, ‘गेट आउट’ म्हटले होते. त्यावर संगीता यांनीही ‘मी जाणार नाही’, असे सुनावले होते. त्यामुळे संतप्त झालेले अनिल विज हेच बैठक सोडून निघून गेले होते. हा प्रकार घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी संगीता कालिया यांची मनेसर येथे बदली करण्यात आली.
उडान पाहून प्रेरणा : संगीता यांनी लहानपणी दूरदर्शनवरील उडान ही मालिका पाहून पोलिस अधिकारी होण्याचा निर्धार केला होता. काही दिवसांपूर्वी ‘भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे सांगितले होते.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, प्रकरणाचा घटनाक्रम आणि असा झाला वाद..