आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Father Brutally Kills Daughter And Her Lover In Rohtak

ऑनर किलींगः मुलीच्‍या पित्‍यानेच केली हत्‍या, तुकडे करुन मृतदेह गावात फिरवला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोहतक- हरियाणातील रोहतक जिल्‍ह्यात ऑनर किलींगची घटना घडली होती. या घटनेचे भीषण वास्‍तव समोर आले आहे. सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मुलीच्‍या पित्‍यानेच तिची आणि तिच्‍या प्रियकराची हत्‍या केली होती. नरेंद्र असे तिच्‍या पित्‍याचे नाव आहे. कु-हाडीने वार करुन त्‍याने स्‍वतःच्‍या मुलीला ठार मारले. त्‍यानंतर तिच्‍या प्रियकराचीही हत्‍या करुन मृतदेहाचे तुकडे केले. तो एवढ्यावरच थांबला नाही. तर, त्‍याने मृतदेहाचे तुकडे ट्रॅक्‍टरच्‍या ट्रॉलीत टाकले आणि गावभर फिरवले. गावभर फिरत असताना तो ओरडून सांगत होता, 'याने आमची प्रतिष्‍ठा धुळीस मिळवली. पाहा, आम्‍ही त्‍याचे काय केले.' त्‍यानंतर नरेंद्रने मृतदेहाचे तुकडे त्याच्‍याच घरासमोर फेकले. तिथून परत गेल्‍यानंतर मुलीचा मृतदेह स्‍मशानात नेऊन पेटवून दिला. शेकडो गावक-यांनी हा प्रकार पाहिला. परंतु, कोणीही तोंड उघडण्‍यास तयार नाही. बाहेरुन आलेल्‍या व्‍यक्तीला पाहताच गावकरी तोंड फिरवतात. गावात दहशतीचे वातावरण आहे.

पोलिसांनी याप्रकरणी नरेंद्र, मुलीची आई रीटा आणि काका र‍वींद्र यांना अटक केली आहे. मुलीचे वडील आणि काकांना 5 दिवसांच्‍या पोलिस कोठडीत पाठविण्‍यात आले आहे. भीषण हत्‍याकांडानंतरही दोघांना पश्‍चाताप नाही. रीटा हिला 14 दिवसांच्‍या न्‍यायालयीन कोठडीत पाठविण्‍यात आले आहे.

असा रचला दोघांच्‍या हत्‍येचा कट... वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये...