आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत बाळ जन्मले, नर्स म्हणाली बेड खाली करा, पित्याने पिशवीत भरून नेले पार्थिव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रमेश विजापूरच्या लंकापल्ली येथील आयपेंटा गावातील आहे. - Divya Marathi
रमेश विजापूरच्या लंकापल्ली येथील आयपेंटा गावातील आहे.
जगदलपूर (छत्तीसगड) - जगदलपूर मेडिकल कॉलेजमध्ये 20 वर्षांच्या यालम रमेश याची पत्नी शशिकलाने एका मृत बाळाला जन्म दिला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने त्यांना लगेचच हॉस्पिटल सोडून जाण्यास आणि बाळाला घेऊन जाण्यास सांगितले. घाई गडबडीत रमेशला त्या नवजात बाळाचे पार्थिव पिशवित भरून न्यावे लागले. 

नर्स म्हणाली, याला लगेचच घेऊन जा.. 
- हे प्रकरण जगदलपूर मेडिकल कॉलेजचे आहे. 
- रमेश विजापूर जिल्ह्यातील लंकापल्लीमधील आयपेंटा गावातील रहिवासी आहे. 
- रमेशने सांगितले की, पत्नीने मृत बाळाला जन्म दिला त्यावेळी नर्सने लगेचच बाळाला घेऊन जा आणि बेड रिकामा करा असे सांगितले. 

कलेक्टरला काहीही समजले नाही.. 
- रमेशला काय कळावे ते समजले नाही, त्यामुळे तो थेट मदतीसाठी कलेक्टर अमित कटारिया यांच्याकडे गेला. 
- रमेश स्थानिक भाषेत बोलत होता, त्यामुळे कटारिया यांना काही कळेना, त्यांनी रेडक्रॉसच्या कार्यकर्त्यांना त्याची मदत करण्यास सांगितले. 
- त्यांनी औषधे दिली पण तो त्यांना नेमका मुद्दा सांगू शकला नाही. ते हॉस्पिटलमध्ये आले तेव्हा संपूर्ण प्रकरण त्यांच्या ल७ात आले. त्यांनी रुग्णालयातील लोकांशी चर्चा केल्यानंतर त्यांना मॉतदेहासह अॅम्ब्युलन्समध्ये पाठवण्यात आले. 

यापूर्वी अशा प्रकारच्या मानवतेला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना गेल्या काही दिवसांत घडलेल्या आहेत. त्या घटनांची माहिती आम्ही तुम्हाला पुढील स्लाइड्सवर देणार आहोत..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...