आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी मुलीचे लव्ह मॅरेज लावून दिले, 6 महिन्यानंतर चिरला जावयाचा गळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जावई रफतचा मृतदेह आणि मुलगी मीनू... - Divya Marathi
जावई रफतचा मृतदेह आणि मुलगी मीनू...
मनीमाजरा (अमृतसर) - मनीमाजरा येथे ऑनर किलिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी वडील सौदागर याला अटक केली. सौदागरने आपली मुलगी मीनू हिचा विवाह 6 महिन्यांपूर्वी रफत अली याच्याशी लावून दिला. मनात विरोध असतानाही त्याने लग्नाला विरोध केला नाही. मात्र, 6 महिन्यानंतर सौदागरने जावई रफतचा गळा चिरून फेकून दिले. लग्नापूर्वीच जीवे मारले असते तर संशय आपल्यावरच झाला असता म्हणून वाट पाहिले अशी कबुली सौदागरने दिली आहे. 
 

सासरवाडीतच राहत होता जावई
- 27 वर्षीय रफत मोरीगेट परिसरात आपला सासरा सौदागरच्या घरी घरजावई म्हणून राहत होता. त्याची पत्नी मीनू एका रुगणालयात नर्स आहे. 
- सौदागरने पोलिसांना सांगितल्याप्रमाणे, तो रफतला मॉडर्न कॉम्पलेक्सच्या एका जंगसदृश्य परिसरात घेऊन गेला. यानंतर त्याच ठिकाणी रफतचा गळा चिरून फेकून दिले. 
- रफत मूळचा सहारनपूर येथील रहिवासी होता. काही दिवसांपूर्वीच तो मनीमाजरा येथे आला होता. मनीमाजराचा रस्ता देखील त्याला व्यवस्थित माहिती नव्हता. 
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रफत आणि मीनूचा विवाह परिवाराच्या संमतीनेच झाला होता. मात्र, सौदागर मनातून यासाठी तयार नव्हता. तो लग्नावर नाराज होता. 
 

असा पकडला गेला आरोपी
- रफत मनीमाजरा येथे व्यापारी मंडळ अध्यक्ष ओमप्रकाश बुद्धिराजाच्या दुकानावर 15 दिवसांपूर्वीच कामावर लागला होता. बुद्धिराजाने सांगितल्याप्रमाणे, दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास सौदागर दुकानावर आला आणि आपल्यासोबत जावई रफतला घेऊन गेला. सौदागर गुरुवारी रफतला घेऊन जाताना रफत शुक्रवारी येणार नाही असेही सांगून गेला. 
- मीनू शुक्रवारी बुद्धीराजाच्या दुकानावर आपल्या पतीबद्दल चौकशी करण्यासाठी आली. तिनेच दुकानदाराला सांगितले की आपण आणि आपल्या वडिलांनी पोलिसांत जाऊन रफतच्या बेपत्ता होण्याची तक्रार सुद्धा दिली. तोपर्यंत सौदागरवर कुणालाही संशय झाला नाही.
- यानंतर बुद्धीराजाने पोलिसांना गुरुवारची माहिती दिली. त्यानेच पोलिसांना सांगितले की सौदागर दुकानावर येऊन रफतला घेऊन गेला होता. त्यानंतर सौदागरने आपण दुकानावर गेलोच नाही असा दावा केला. 
- पोलिसांनी दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. यातूनच सौदागर दुकानावर आपल्या जावयाला घेण्यासाठी गेला होता हे सिद्ध झाले. पोलिसांनी आपल्या शैलीत फटके देऊन सौदागरची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा मान्य केला. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...