आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्दयी पित्याने हसत-हसत पोलिसांना सांगितली पोटच्या दोन्ही मुलींना जिवे मारल्याची कहाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - निर्दयी पिता भरत पोलिसांच्या तावडीत)
अहमदाबाद (गुजरात) - आपल्या पोटच्या पोरींची गळा दाबून हत्या केल्यानंतर एका निर्दयी पित्याने पोलिसांसमोर संपूर्ण घटनेचे हसत हसत कबुली दिल्याची सरदार नगरमधील घटना अंगावर शहारे आणणारी होती. पित्याचे हे आगळे वेगळे रुप पाहून पोलिसही आश्चर्यचकित झाले.
सरदार नगरमध्ये राहणार्‍या भरत भाई लेऊआने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, दोन्ही मुलींची हत्या करण्याआगोदर भरतने स्वामीनारायण मंदिरातन 90 रुपयांची खिचडी आणि सरदार नगरमधून 250 ग्रॅम जिलेबी विकत घेतली. भरतने खिचडीमध्ये झोपेच्या 18 गोळ्या टाकल्या आणि ही खिचडी मोठी मुलगी भूमिकाला खाऊ घातली. खिचडी खाल्यानंतर ती बेशुध्द पडली त्यानंतर या पित्याने भूमिकाचा गळा दाबून तिची हत्या केली. ही सर्व घटना भरतची मतीमंद असलेली लहान मुलगी फाल्गूनी पाहात होती. मोठ्या मुलीला मारल्यानंतर हा निर्दयी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने कोल्ड्रींकमध्ये 8 झोपेच्या गोळ्या टाकून ते फाल्गूनीला पाजले. कोल्ड्रींक पिल्यानंतर फाल्गूनीही बेशुध्द झाली. त्यानंतर मोठ्या मुलीप्रमाणे या हैवान पित्याने तिचीही गळा दाबून हत्या केली. त्यानंतर भरत यांनी पोलिस स्टेशनमध्ये येऊन आपल्या गुन्ह्याची कबूली दिली.
दोन्ही मुलींना ठार केल्यानंतर हा भरतने सरदार नगर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या गुन्ह्याची कबूली दिली. एवढेच नाही तर त्याने ही संपूर्ण घटना हसत हसत पोलिसांना सांगितली.
पोलिसांसमोर भरत यांनी सांगितले की, माझी पत्नी मधू माझ्यावर 17 वर्षांपासून संशय घेत होती. मागील शनिवारी पौर्णिमेच्या दिवशी दर्शन घेण्यासाठी ती भावनगर येथील मंदिरात जाणार होती. तिने मला सोबत चलण्यास विचारले. मात्र मी नकार दिला. माझ्या नकारानंतर ती माझ्याशी खुप भांडली. त्या रात्री मी या दोन्ही मुलींना जीवे मारण्याचा विचार करत होतो.
या दोन्ही मुलींची हत्या केल्यानंतर मी माझा अमराईवाडी भागात राहणारामेव्हणा आणि सरदार नगरमध्ये राहणारा माझा काका रेवसदार यांना फोन केला होता आणि संपूर्ण घटनेची त्यांना माहिती दिली. मी त्यांची वाट पाहात होतो मात्र कोणीच आले नाही. त्यामुळे मी माझ्या घराचे दार बाहेरून बंद करून पोलिस स्टेशनला आलो आहे.
आपोरी भरत भाई यांच्या कुटुंबात पत्नी मधुबेन समवेत तीन मुली आहेत. सर्वात मोठी मुलगी कृतिका (वय 26) ही अहमदाबादच्या आश्रमरोड येथील सेल टॅक्स ऑफिसात काम करते. कृतिका काल रात्री घरी नव्हती त्यामुळे तिचा जीव वाचला. तर मधली मुलगी भूमिका (वय 24) ही 11 वीत शिकत होती आणि सर्वात लहान मुलगी फाल्गूनी (वय 19) ही मेंटली चॅलेंज्ड होती. भरत यांच्या 26 वर्षांच्या वैवाहिक जीवनात या पती-पत्नीमध्ये मागील 17 वर्षांपासून भांडणे होत होती.

पुढील स्लाईडवर पाहा, कार्टूनमधून पाहा कशा प्रकारे घेतले या निर्दयी पित्याने आपल्या मुलींचे प्राण