आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीने लग्नास नकार दिल्‍याने पित्याने केला गोळ्या घालून खून; लखनऊ येथील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतीक फोटो - Divya Marathi
सांकेतीक फोटो
लखनऊ- उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे लग्नास नकार देणाऱ्या मार्टिना (२८) नावाच्या मुलीचा पिता राकेश बाबू याने  संतापाच्या भरात बंदुकीतून गोळ्या घालून खून केला.  राकेश बाबूला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच मार्टिनाचे दोन भाऊ यश व अजित यांनाही  पकडले. वरिष्ठ पोलिस अधिकारी दीपककुमार यांनी सांगितले, ११ नोव्हेंबर रोजी मार्टिना गुप्ता हिचा गोळी लागल्याने मृत्यू झाला होता. तिच्या वडिलांनी तिने आत्महत्या केल्याचे म्हटले होते. परंतु तिला पाच गोळ्या लागल्याचे दिसले. यावरुन प्रकरण संशयास्पद वाटले. मार्टिनाच्या आईने नवरा राकेश यानेच खून केल्याचा संशय घेतला होता. राकेश बाबूची चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. राकेश व त्याच्या दोन मुलांना अटक झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...