आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोटच्या मुलीवर बलात्कार करायचा बाप, ओरडल्यानंतरही मदत करत नव्हती सावत्रआई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर- पंजाबमधील बटाला येथे नराधम बापाने पोटच्या पोरीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधम बाप दररोज रात्री मुलीवर जबरदस्ती करत होता. आरडाओरड केल्यानंतरही सावत्र आई, भाऊ मदतीसाठी येत नसल्याचे पीडितेने सांगितले आहे.

नराधम बापाने सलग सहा महिने बलात्कार केल्याचे पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. बापाच्या जाचाला कंटाळून अखेर पीडितेने कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.

बटालाच्या एसएसपीला मागितला कोर्टाने अहवाल...
- कोर्टाने बटालाच्या एसएसपीला या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच चौकशी अहवाल कोर्टात सादर करण्यास बजावले आहे.
- पीडितेने सांगितले की, एके दिवशी घरात कोणीही नव्हते.
- तिने तिथून पळ काढला आणि पोलिसांना आपबिती सांगितली. पण बटालाचे एसएसपी यांनी तिला वूमेन सेलमध्ये पाठवले. तिथेही पीडितेच्या पदरात निराशाच पडली.
- पीडितेने अखेर कोर्टाचा दरवाजा ठोठावून दोषी बापाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.

प्रकरण संवेदनशिल, चौकशी सुरु आहे- एसएसपी
एसएसपी दिलजिंदर सिंह ढिल्लों यांनी सांगितले की, कोर्टाचे आदेश मिळाले आहे. प्रकरण संवेदनशिल असून याची सखोल चौकशी सुरु आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, काय आहे हे प्रकरण....?
बातम्या आणखी आहेत...