आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Father Raped His Minor Daughter For One Year In Chandigad

अकरावीतील विद्यार्थीनीवर वडिलांनी केला बलात्कार, भावाला सांगितल्यानंतर त्यानेही छेडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड - अकरावीतील एक विद्यार्थीनी मंगळवारी वर्गशिक्षीकेच्या गळ्यात पडून ओक्साबोक्सी रडू लागली. शिक्षीकेला वाटले, वर्गातील कोणी तिला बोलले असेल म्हणून ती दुखावली असेल. त्या विद्यार्थीनीला रडण्याचे कारण विचारले तेव्हा तिने म्हटले, की मला प्राचार्यांना भेटायचे आहे. प्राचार्यांच्या कक्षात विद्यार्थीनी म्हणाली, माझे वडिलांना पोलिसांच्या ताब्यात द्या. एक वर्षांपासून ते माझ्यावर बलात्कार करत आहे.
विद्यार्थीनीने प्राचार्यांना सांगितले, की वडिलांनी वर्षभरात दोन वेळा तिला गर्भपात करायला लावला आहे. या अत्याचाराची माहिती तिने चुलत भावाला दिली. त्याने काकाला धमकावले पण नंतर त्यानेच तिच्यावर वाईट नजर टाकली. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे, तर पीडितेचा चुलत भाऊ फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पीडित मुलीची आई आजारी आहे. घरात तीच सर्वात मोठी असून तिला एक बहिण आणि एक भाऊ आहे. प्राचार्यांनी तिची आपबीती ऐकल्यानंतर त्यांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ समाजकल्याण विभागाला याची माहिती दिली. समाज कल्याण विभागाच्या पथकाने युवतीला स्नेहालय या महिला सुधारगृहात पाठविले आहे.
आईने शांत राहाण्याचा सल्ला ठरला घातक
युवतीवर जेव्हा शारीरिक आणि मानसीक आघात होत होते, तेव्हा तिने तिच्या आईला याबद्दल सांगितले होते. आजारी असलेली तिची आई हे ऐकून आणखी आजारी पडली. आईची अवस्था पाहून ती शांत राहिली आणि सगळे सहन करत गेली. मात्र, तिच्या या शांततेनेच तिच्यावरील अत्याचार वाढले.

पुढील स्लाइडमध्ये, घर खरेदीसाठी नवविवाहीत पत्नीला केले परपुरुषाच्या स्वाधिन