आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फतवा : आजम खान गुन्हेगार आहेत, त्यांच्याशी भेटीगाठी बंद करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे मंत्री आजम खान यांच्या विरोधात मुस्लिम संघटनांनी फतवा जारी केला आहे. आजम खान हे गुन्हेगार असून त्यांच्या भेटीगाठी बंद करा, असे मुस्लिम धर्मगुरूंनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदीर बनणार असेल तर समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांचेही मंदिर बनवले गेले पाहिजे , असे विधान आजम खान यांनी केले होते. यावर रामपूर येथील मुस्लिम धर्मगुरुंनी त्यांना गुन्हेगार व जहन्नुमी असल्याचे जाहीर करून त्यांच्याविरोधात फतवा जारी केला आहे.
इस्लाममध्ये मंदीर या शब्दाचा वापर करणे हराम व गुन्हा आहे. त्यासाठी आजम यांनी माफी मागितली पाहिजे.जोवर ते माफी मागत नाहीत तोवर त्यांच्याशी बोलणे बंद करावे.
असे फतव्यात म्हटले आहे.