आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fatwa On Aam Aadmi Party Topi By Muslim Personal Law Board

मुस्लिमांनी 'आप'ची टोपी घालू नये, वाराणसीच्या मौलानांनी काढला फतवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी - आम आदमी पार्टीची टोपी सध्या इतरही पक्ष स्विकारत असताना वाराणसी येथील मौलानांनी मुस्लिमांनी ही टोपी घालू नये असा फतवा काढला आहे. येथील शाही जामा मस्जिद बादशाह बागचे शाही इमाम मौलाना हसन अहमद हबीबी आणि बनारस व मुफ्ती-ए-बनारस अहले सुन्नत मोईनुद्दीन फारुकी यांनी आपच्या टोपीवर फतवा काढला आहे.
त्यात म्हटले आहे, की आपच्या टोपीवर झाडूचे चित्र असते. झाडूचा वापर हा घाण साफ करण्यासाठी केला जातो. त्यामुळे अशी टोपी कोणीही डोक्यावर ठेवू नये.
मौलाना हसन अहमद हबीबी म्हणाले, मुस्लिम बांधवांकडून विचारणा झाली की, आम्ही 'आप'ची टोपी घातलेली चालेल का? त्यावर हा फतवा काढण्यात आला आहे. टोपीवर जर झाडूचे चित्र असले तर तशी टोपी मुस्लिम बांधवांनी घालू नये. झाडू असेल नाही तर बुट त्याला डोक्यावर घेणे योग्य नाही.
हबीबी म्हणाले, बनारस व मुफ्ती-ए-बनारस अहले सुन्नत मोईनुद्दीन फारुकी, मुफ्ती अब्दूल हादी खान यांसारख्या अनेक मौलवींनी एकत्र येऊन यावर विचार केला आणि मुस्लिमांच्या हितामध्ये हा फतवा काढण्यात आला आहे.