आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानचा सर्वात मोठा महाल; 22 राजांनी दिले योगदान, 400 वर्ष चालले बांधकाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूर - राजस्थानचे उदयपूर शहर आपल्या सौंदर्यासाठी जगभरात प्रसिध्द आहे. येथे असलेल्या मोठमोठ्या हवेल्या आणि भव्य महाल पाहून पर्यटक मंत्रमुग्ध होतात. याच महालांमध्ये एक आहे 'सिटी पॅलेस'. हे महाल पिछौला तलावाच्या किनारे एका उंच डोंगरावर बनवलेली आहे. या ठिकाणाहून संपूर्ण शहराचे विहंगमदृश्य पाहावयास मिळते. हे महाल राजस्थानमध्ये असलेल्या अशा प्रकारच्या महालांमध्ये सर्वात मोठे आहे. या महालाच्या परिसरात असलेले 11 इतर महाल, आणि हे बनवण्यासाठी 22 राजांनी दिलेले योगदान यावरूनच या महालाच्या भव्यतेचा अंदाज लावता येईल. या महालाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू म्हणजे दिलखुश महाल, शीश महाल, मोर चौक, मोती महाल आणि कृष्ण विलास ही ठिकाणे आहे. याशिवाय या महालामध्ये अनेक घुमट, आंगण, गल्ल्या, खोल्या, मांडव, मिनार आणि हॅंगिग गार्डन आदी वास्तू महालाच्या सुंदरतेमध्ये अधीक भर घालतात.
येथे रॉकेलवर चालतो पंखा
या महालातील एक महत्त्वाचे आकर्षण आहे तो म्हणजे एका खोलीत असलेला पंखा. या पंख्याला चालवण्यासाठी 220 वोल्टची वीज नाही तर रॉकेल पाहिजे. सुरूवातीला रॉकेल पेट घेते त्यानंतर त्याच्या गरमीने हवेचा दाब बनतो. हवेच्या या दाबाने टरबाईनसारख्या या पंख्याच्या आतील काही भाग फिरायला लागतो, ज्यामुळे पंखाही आपोआप सुरू होतो. या महलातील काही भागांत हॉटेल सुरू करण्यात आले आहे. यांची नावे शिव निवास पॅलेस आणि फतेह प्रकाश पॅलेस अशी आहेत. या ठिकाणी क्रिस्टलने बनवलेल्या अप्रतिम वस्तू मिळतात.
महालाचे बांधकाम
1569 मध्ये महाराणा उदय सिंह यांनी या महालाचे बांधकामास सुरूवात केली. यानंतर अनेक राजांनी आपापल्या शासनकाळात हे बांधकाम पुढे नेले. 11 टप्प्यात बांधण्यात आलेल्या या महालाचे बांधकामात कोठेच काहीच फरक जाणवत नाही. असे वाटते की हे सर्व बांधकाम एकाच टप्प्यात झाले असावे. या महालाच्या संपूर्ण बांधकामास 400 वर्ष लागले आहेत. याकाळात 22 राजांनी या महालाचे आपापल्या कार्यकाळात बांधकाम केले.

या महालातील प्रेक्षणिय स्थळे

काचेची गॅलरी
याला मानक महालसुध्दा म्हटले जाते. यामध्ये काच आणि आरस्यांचा वापर करून उत्कृष्ट असे नक्षीकाम करण्यात आले आहे. या गॅलरीत, खुर्च्या, पलंग, सोफा सर्वच वस्तू काचेच्या बनलेल्या आहेत. राणा सज्जन सिंह यांनी 1877 मध्ये इंग्लंडच्या एफ अँड सी ओसलर अँड कंपनीकडून हे सर्व काचेचे सामान विकत घेतले होते.

दरबार हॉल
महालाचे हे दरबार सभागृह पाहाचक्षणी डोळ्यात भरते. याच्या भिंतीवर अवजार आणि मेवाडच्या माजी महाराणांची चित्रे लावण्यात आली आहेत. या सभागृहाचा पाया भारताचे व्हाईसरॉय असलेले लॉर्ड मिंटो यांनी 1909 मध्ये बांधला होता, यामुळेच या सभागृहाला मिंटो हॉलसुध्दा म्हटले जाते.

त्रिपोलिया गेट
या महालात प्रवेश करण्यासाठी बनवण्यात आलेल्या प्रमुख द्वाराचे नाव त्रिपोलिया गेट असे आहे. या दरवाज्याचीही एक कहाणी आहे. त्रिपोलिया म्हणजेच तीन पोल (खांब) चे गेट. या गेटची निर्मिती 1710 मध्ये महाराणा संग्राम सिंह व्दितीय यांनी केली होती. या गेटवर एक हवा महाल बनवण्यात आले आहे, ज्याला महाल बांधल्यानंतर जवळपास 100 वर्षांनंतर महाराजा भीम सिंह यांनी बांधले आहे. येथे राजांना सोन्या चांदीमध्ये तोलण्यात येत होते. ज्यानंतर हे सर्व धन गरिबांमध्ये वाटण्यात येत होते. या गेटच्या समोरील भिंतीला 'अगद' म्हणतात. जेथे हत्तींचे युध्द होत असे.

मोठ्या समारोहासाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत हे महाल
या महालमध्ये चित्रपट अभिनेत्री रवीना टंडन आणि लखनऊचे मोठे उद्योगपती गौरव शर्मा यांसारख्या मोठ्या व्यक्तींचे विवाह झाले आहेत. गौरव शर्माच्या लग्नात प्रियांका चोप्रा, हृतिक रोशन, विशाल शेखर, टॅरेंस लेविस आणि आलिया भट्ट यांनी परफॉर्म केले होते.

पुढील स्लाईडवर पाहा... या महालाचे फोटो