आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fellow Player Goes To Police, Says He Reneged On Promise Of Marriage

प्रेयसीला धोका देऊन दुसरीसोबत करणार होता लग्न, व्हॉलिबॉल खेळाडूला अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंतरराष्ट्रीय व्हॉलिबॉल खेळाडू एम नवीन राजा जेकब - Divya Marathi
आंतरराष्ट्रीय व्हॉलिबॉल खेळाडू एम नवीन राजा जेकब
चेन्नई- आंतरराष्ट्रीय व्हॉलिबॉल खेळाडू एम नवीन राजा जेकब (28) याला माजी महिला खेळाडूला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याच्या आरोपावरून शहर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. नवीन याच्याविरोधात कलम 417 (धोका देणे), 506 (धमकी देणे) आणि सेक्शन-4 (तमिळनाडू राज्य महिला शोषण कायदा) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रियांकाने ही केस दाखल केली आहे कारण तिला कळाले की, 13 जुलै रोजी जेकबचे लग्न होत आहे. जेकबचा विवाह कोईमतूर येथील पोलिस आयुक्ताच्या मुलीशी होत आहे.
मिळत आहे धमकी-
प्रियंकाने नवीन, तसेच त्याच्या परिवाराकडून आणि नवीनच्या होणा-या नव्या सासुरवाडीच्या लोकांकडून धमक्या येत आहेत. नवीनने 20 जून रोजी फोन करून तक्रार परत घेण्याची व यापुढे कोणत्याही प्रकारचा संबंध न ठेवण्यास सांगितले. जर असे केले नाही त्याचे परिणाम वाईट होतील असेही जेकबने धमकी दिली. त्यानंतर जेकबच्या घरचेही माझ्या घरी आले होते व लग्नात अडथळा आणू नये यासाठी दबाव टाकत होते. नवीच्या भावी सास-याने जो कोईमतूरचे पोलिस आयुक्त आहेत त्यांनीही जेकब व माझ्या मुलीच्या आयुष्यात लुडबूड करू नको असे बजावले होते.
2010 पासून राहत होते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये-
बंगळुरूची माजी महिला व्हॉलिबॉल खेळाडू एन. प्रियंका (25) हिने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नवीन जेकब आणि मी 2010 पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. आमची भेट एका सामन्यादरम्यान झाली होती. आमच्या प्रेमाची सुरुवातच इमोशनल ब्लॅकमेलमधून झाली होती. नवीनने आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी हाताची नसही कापली होती. यानंतर आम्ही दोघे कोदम्बकम आणि बंगळुरु येथे एकाच घरात कपल म्हणून राहत होतो.
पुढे स्लाईडसच्या माध्यमातून पाहा, नवीनचे फोटोज...