आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईहून व्हाट्सअॅपवर पाठवला तलाक... तलाक... तलाक... ; म्हणाला, घे तुझे बर्थडे गिफ्ट!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सासू-सासरे काळी जादू करत - पीडित - Divya Marathi
सासू-सासरे काळी जादू करत - पीडित
हैदराबाद - येथील सुमायना नावक महिलेला तिच्या पतीने चक्क दुबईवरून व्हॉट्सअॅवर ट्रिपल तलाक पाठवला. यामध्ये त्याने हा तुझा बर्थडे गिफ्ट समज असेही लिहिले. गेल्या काही महिन्यांपासून ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर वातावरण पेटले असताना हे प्रकरण समोर आले. 
 
सासू-सासरे काळी जादू करत...
- पीडित महिला सुमायनाने सांगितल्याप्रमाणे, तिचे सासू आणि सासरे घरात काळी जादू करत होते. तसेच मानसिक आणि शारीरिक छळ सुद्धा करत होते. व्हॉट्सअॅपवरून तलाकचा मॅसेज आल्यानंतर आपल्या वडिलांनी माहेरी आणल्याचे तिने सांगितले. 
- मॅसेजमध्ये पीडितेच्या पतीने लिहिले, "तलाक, तलाक, तलाक. हा माझा अंतिम निर्णय आहे. कुणाला घेऊन येतेस आण... कुणाला सांगणार ते सांग... कुणाचा बापही माझे काही वाईट करू शकणार नाही. तुला हेच हवे होते ना... घे तुझ्या वाढदिवसाचे गिफ्ट..."
 
 
तर दुसरीकडे, अमरोहा येथे नॅशनल नेटबॉल खेळाडू शुमायला जावेद हिला तिच्या पतीने केवळ मुलगी झाल्याच्या कारणावरून तीनदा तलाक दिला. निकाह झाला, तेव्हापासूनच सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा छळ केला. गर्भवती असल्याचे कळताच तिच्यावर मुलगा जन्माला घालण्यासाठी दबाव टाकण्यात आला. शुमायलाने नुकतेच एका मुलीला जन्म देताच, पतीने तिची साथ सोडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून न्याय मागणार असे शुमायलाने स्पष्ट केले. 
 
पीएम मोदी, सीएम योगींना पत्र पाठवणार
- शुमायला आता पत्र लिहून पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांच्याकडे दाद मागणार आहे.  
- 'मन की बात' संवादात मोदींनी यापूर्वीच ट्रिपल तलाकला वाईट सामाजिक प्रथा म्हटले आहे. 
- तर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ट्रिपल तलाकवर ठाम आहे. शरिया कायद्याच्या विरोधात जाऊन कुणी तलाक देत असेल तर, त्यांचा सामाजिक बहिष्कार करू असे लॉ बोर्डने स्पष्ट केले.
 
पुढील स्लाईड्समध्ये वाचा... व्हॉट्सअॅपचा तो मॅसेज...
बातम्या आणखी आहेत...