आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीमला चीअर करायला आल्या Female Fans, रणरणत्या उन्हात पाहिली मॅच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टेडियमवर आलेली टीम इंडियाची एक चाहती. - Divya Marathi
स्टेडियमवर आलेली टीम इंडियाची एक चाहती.
इंदूर - बुधवारी इंदूरमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान दुसरा वन डे सामना झाला. यावेळी मोठ्या संख्याने क्रिकेट चाहते सामना पाहण्यासाठी आलेले होते. त्यात टीम इंडियाच्या अनेक फिमेल फॅन्सचाही समावेश होता. संपूर्ण मॅच संपेपर्यंत या फॅन्सनी टीमला चीअर केले. कोणी चेहऱ्यावर तिरंग्याचा टॅटू काढला होता तर कोणी हाती तिरंगा घेतलेला होता. रणरणत्या उन्हातही हे फॅन्स टीम इंडियाला चीअर करत होते.

सकाळी नऊपासून प्रेक्षक यायला सुरुवात
चारही बाजुला उत्साही तरुण. हातांमध्ये मॅचचे तिकिट आणि तिरंगा. चेहऱ्यावर तिरंग्याचेच पेंटिंग. सामना सुरू होण्यापूर्वी बुधवारी होळकर स्टेडियमबाहेर हेच चित्र पाहायला भेटले. मॅच दीड वाजता सुरू होणार असली तरी प्रेक्षक सकाळी 9 वाजेपासूनच यायला सुरुवात झाली होती. प्रवेश दिल्यानंतरही पाच ठिकाणी तिकिट तपासण्यात आले. अनेक लोकांना पार्किंग शोधायलाही बरीच अडचण झाली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, टीम इंडियाला चीअर करायला आलेल्या फॅन्सचे PHOTOS
बातम्या आणखी आहेत...