आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्‍मानंतर चिमुकलीला जिवंत पुरले शेतात, 24 तासांमध्‍ये मालवली प्राणज्‍योत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतापगढ- राजस्‍थान स्‍त्रीभ्रूणहत्‍येचा एक भीषण प्रकार उघडकीस आला आहे. एका नवजात बलिकेला जन्‍मल्‍यानंतर काही मिनिटांमध्‍येच एका शेतात जिवंत गाडण्‍यात आले. तिच्‍या रडण्‍याचा आवाज ऐकल्‍यानंतर शेतमालकाने बाहेर काढून रुग्‍णालयात नेले. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्‍टरांचे प्रयत्‍न तिला जीवदान देऊ शकले नाहीत.

या चिमुकलीला जगात येऊन 24 तासही श्‍वास घेता आले नाही. प्रतापगढमधील वडगाव कला या गावातील ही घटना आहे. सोहनलाल मीणा यांना सकाळी 11.30 वाजताच्‍या सुमारास शेतात एका बालकाचा रडण्‍याचा आवाज आला. त्‍यांनी शोध घेतल्‍यानंतर एक चिमुकली शेतात अर्धवट गाडलेल्‍या अवस्‍थेत आढळली. ती जिवंत होती. परंतु, अतिशय निर्दयीपणे तिला मरण्‍यासाठी टाकून देण्‍यात आले होते. तिचे डोके जमिनीबाहेर होते आणि उर्वरित शरीर माती आणि गवतात दबले होते. मुंग्या आणि किडे तिच्‍या शरीरावर होते. सोहनलाल यांनी तत्‍काळ इतर गावक-यांना बोलावून घेतले. तिला बाहेर काढून अचनेरा येथील सार्वजनिक आरोग्‍य केंद्रात नेण्‍यात आले. डॉ. विष्‍णू शर्मा यांनी तिच्‍यावर अर्धा तास उपचार केले. परंतु, सर्व प्रयत्‍न अपयशी ठरले.

मुलीचा जन्‍म शनिवारी रात्री आठ ते नऊ वाजतादरम्‍यान झाला होता. तिला रात्रीच पुरण्‍यात आले होते. मुलगी कोणाची आहे, हे कळू शकले नाही. शवविच्‍छेदनानंतर तिच्‍या मृतदेहवर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले.

सोहननलाल यांनी गावक-यांसोत पोलिसांनाही माहिती दिली होती. त्‍यानंतर मुलीला रुग्‍णालयात नेण्‍यासाठी 108 क्रमांकावर कॉल करुन रुग्‍णवाहिका बोलावली होती. परंतु, रुग्‍णवाहिका पोहोचण्‍यास 1 तास उशीर झाला. तिला आरोग्‍य केंद्रात नेण्‍यात आले. परंतु, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. रुग्‍णवाहिका वेळेत पोहोचली असती तर कदाचित तिचे प्राण वाचवता आले असते. नाळ न कापल्‍यामुळे तिच्‍या शरीरात संसर्ग झाला होता.