आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

येथे मुलींना खाटेवरही बसण्यास परवानगी नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुडगाव - गुडगावपासून साधारण ८० किमी अंतरावर हरियाणात मेवात हे एक छोटेसे गाव. औद्योगिक वसाहतीपासून जवळपास अडीच तास अंतरावर शेकडो वर्षे आधी इथे जग जणू स्तब्ध झाले आहे. अनेक किमी पायपीट करून पाणी भरणे, अनेक मुलांना जन्म देऊन कुटुंब वाढवणे आणि पन्नाशी गाठण्याआधीच मृत्यू ओढवणे ही येथील नित्याची गोष्ट. येथील बहुतांश महिलांची हीच अवस्था आहे. मग ती विकत आणलेली नवरी असो की स्थानिक मुलगी. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाची सुरुवात करणाऱ्या या राज्यातील हा असा भाग आहे, ज्या गावांतील एकाही मुलीने दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेले नाही. पंजाब विद्यापीठातील विद्यार्थी अभ्यासासाठी या भागात गेले होते. "सेंटर ऑफ एक्सलन्स इन कल्चरल फिक्सेशन ऑन ऑनर : अ जेंडर ऑडिट ऑफ पंजाब अँड हरियाणा'च्या विद्यार्थी स्वयंसेवकांनी "दैनिक भास्कर'शी आपले अनुभव आणि प्राथमिक अहवालावर चर्चा केली तेव्हा महिलांच्या भयावह स्थितीचे चित्र समोर आले. त्यांनी सांगितले की त्या गावात शिरताच पोलिसांच्या जीप बाहेर दिसतात. सतत होणाऱ्या वादामुळे कायम पोलिसांचा फौजफाटा इथे असतो. मुली, महिलांनी अन्य लोकांशी बोलणेही वर्ज्य आहे. त्यामुळे ज्या स्वयंसेवकांनी पाच गावांची निवड केली. आरक्षणामुळे या गावचे सरपंचपद महिलेकडे आहे. त्यांच्या दिराने आम्हाला मदत केली. यानंतर स्वयंसेवकांना महिला व पुरुषांना भेटण्यासाठी घरात प्रवेश मिळाला. गावात प्रवेश करताच गेल्या वर्षी काही पत्रकार दिल्लीहून आल्याची माहिती मिळाली. त्यांना व्यवस्थित वागणूक देण्यात आली नव्हती. त्यामुळे कॅमेऱ्याशिवाय महिला अभ्यासकांनी तोंड झाकून लपून रेकॉर्डिंग केले. जवळ उभ्या १३-१४ वर्षांच्या एका मुलीला बोलावले तेव्हा ती आईसोबत खाटेवर बसली. बाहेरून भावाने पाहिल्यानंतर तिला खाटेवर बसल्याची शिक्षा मिळाली. येथील मुलींना खाटेवर बसण्याची परवानगी नाही हे नंतर कळले. तिला जमिनीवर बसवण्यात आले. आई सासू झाल्यामुळे ती वर बसू शकत होती. केवळ दोन गावांच्या भेटीतून लक्षात आले की, १० टक्के महिलांना बाहेरून खरेदी करून आणले. बाळंतपणानंतरही योग्य औषधोपचार न मिळाल्याने अनेकींचा मृत्यू झाल्याचे आढळले.
बातम्या आणखी आहेत...