आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 आठवड्यांची प्रेग्नेंट आहे 15 वर्षांची रेप व्हिक्टिम, तिकडे ऑपरेशनची तयारी, ती अभ्यासात मग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भिवानी (हरियाणा) - ती फक्त 15 वर्षांची आहे. सातव्या वर्गात शिकते. कालही अभ्यासात हुषार होती आणि आजही आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न कालही होते आणि आजही आहे. उलट आता त्या स्वप्नाला जिद्दीची साथ आहे. साडे सात महिन्यांपूर्वी तिच्या कॉलनीत राहाणाऱ्या एका शाळकरी अल्पवयीन मुलाने तिच्यावर जबरदस्ती केली होती. या अत्याचाराने भयभीत झालेल्या श्वेताने (नाव बदलले आहे) कोणालाही काहीही सांगितले नाही. एका महिन्यानंतर जेव्हा पोटात दुखायला लागले तेव्हा कुटुबीयांनी तिला हॉस्पिटलला नेले. अल्ट्रासाऊंड रिपोर्ट आला आणि सर्वांना धक्काच बसला. ती गर्भवती होती. घटना समोर येताच दुसऱ्याच दिवशी आरोपीला अटक करुन सुधारगृहात रवानगी करण्यात आली. गर्भ 31 आठवड्यांचा झाल्याने
डॉक्टरांनी गर्भपात करण्यास नकार दिला....
- प्रेग्नेंसी जास्त दिवसांची असल्याने डॉक्टरांनी गर्भपातास नकार दिला. आता 15 वर्षांची ती 31 आठवड्यांची गर्भवती आहे.
- तिच्या जीवालाही धोका आहे. गेल्या आठवड्यात सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ऑपरेशनद्वारे डिलिव्हरी करण्याची तयारी केली आहे.
- अशा अवस्थेतही श्वेता रोज पाच ते सहा तास अभ्यास करत आहे. तिच्या उशाला औषधी आहे आणि पुस्तकेही.
व्हिक्टिमने सांगितले - जे झाले ते झाले.. त्यामुळे माझ्या स्वप्नांचा बळी देणार नाही
- चार भावा-बहिणीत श्वेता सर्वात लहान आहे. गेल्या एक आठवडयापासून ती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे. जेव्हा तिला येथे आणले गेले तेव्हा तिचे हिमोग्लोबिन लेव्हल अवघे 7 ग्रॅम होते.
- एचबी वाढण्यासाठी तिला इंजेक्शन दिले गेले तेव्हा कुठे ते 8 पर्यंत गेले आहे. तिला एका स्पेशल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. ती मानसिक दृष्ट्या सक्षम राहावी यासाठी मानसोपचार तज्ज्ञही बोलवले जात आहेत.
- डॉक्टर सांगतात, की ती मुळातच खंबीर आहे. तिने घरच्यांना सांगून केव्हा पुस्तके मागवली हे आम्हालाही माहित नाही.
- श्वेता हलके स्मित करत सांगते, - जेव्हा मी 5-6 वर्षांची होते तेव्हा बाबा (आजोबा) आजारी होते. डॉक्टर औषधी लिहून देत होते मात्र ते काही घेत नव्हते.
- तेव्हा मी झाडू हातात घेऊन त्यांना घाबरवत होते, औषध घेतले नाही तर इंजेक्शन देईल असे धमकावत होते. माझ्या लाडिक रागाने ते औषधे घेत होते.
- डॉक्टरच्या इंजेक्शनला लोक एवढे घाबरताना पाहून मी म्हणायचे- मोठी झाल्यावर मी डॉक्टरच होणार.
- बलात्काराच्या घटनेचा उल्लेख आल्यानंतर ती म्हणते- जे झाले, ते झाले. त्यामुळे मी माझ्या स्वप्नांचा बळी देणार नाही.
- बालिकेवर उपचार करणाऱ्या डॉक्टर प्रियंका सांगतात, अबॉर्शन करणे शक्य नव्हते. डिलिव्हरीसाठी ऑपरेशन केले जाऊ शकते.
पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समधून जाणून घ्या.. काय म्हणते मुलगी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...