आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fifth Day Transport Break Down, Mansarowar Yatra Cancelled

पाचव्या दिवशीही वाहतूक ठप्पच!, मानसरोवर यात्रा स्थगित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडमधील नैसर्गिक संकटानंतर कैलास मानसरोवर यात्रा स्थगित करण्यात आली आहे. ठिकठिकाणी यात्रेकरूंचे जत्थे अडकले असून त्यांच्यापर्यंत मदतही पोहोचत नाही. 51 यात्रेकरू कुमाऊमध्ये अडकले आहेत. 10 हजार फूट उंचीवरील गुंजी गावात मानसरोवरचे 51 यात्रेकरू अडकले आहेत. जोरदार बर्फवृष्टीमुळे यात्रेकरू पुढे जाऊ शकत नाहीत. मागचा रस्ता वाहून गेल्यामुळे ते परतही येऊ शकत नाहीत. त्यांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने त्वरित बाहेर काढणे आवश्यक ठरले आहे.


गंगा शांत झाल्यानंतर महापुराच्या तडाख्यातून बचावलेले लोक आता सुटकेसाठी वाट पाहत आहेत.अनेक ठिकाणी हेलिकॉप्टर्स उतरण्यासाठीही योग्य जागा नाही. केदारनाथ मंदिरानजीक रुद्रप्रयाग येथे लष्कराच्या हेलिकॉप्टर्सची चातकासारखी वाट पाहत उभे राहिलेले हे भाविक.