आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fifth Standard Student Died Because Of Closed Her In Toilet

कोलकात्यात पाचवीतल्या विद्यार्थिनीला शौचालयात कोंडल्याने मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - येथील मुलींच्या विद्यालयात एका विद्यार्थीनीला शौचालयात कोंडून ठेवण्यात आले होते. त्या धक्क्याने 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या संतप्त नातेवाईकांनी शाळेवर जोरदार हल्लाबोल करून कार्यालयाची मोडतोड केली. दरम्यान, शाळेच्या मुख्याध्यापिका हेलेन सरकार यांनी राजीनामा दिला आहे.


गेल्या आठवड्यात डम डम येथील ख्रिस्त चर्च गर्ल्स हायस्कूलमधील ओएंड्रिला दास या पाचवी शिकणा-या मुलीला मोठ्या वर्गातील काही मुलींनी मिळून शौचालयात कोंडून ठेवले होते. बाहेरून कुलूप लावण्यात आल्याने तिला बाहेर येता येत नव्हते. शाळेच्या वेळेतच हा प्रसंग घडल्याने दास खूप घाबरून गेली. हा प्रकार तेथे काम करणा-या सेवकाच्या लक्षात आला. त्याने तिला बाहेर काढून घरी पोहचवले. परंतु घडल्या प्रसंगाने ओएंड्रिला पुरती हादरली होती. घरी आल्यानंतर ती जणू कोमातच गेली. त्यामुळे कुटुंबियांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असतानाच बुधवारी (11 सप्टेंबर) तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी गुरूवारी सकाळी हायस्कूलच्या कार्यालयावर जोरदार हल्लाबोल केला. कार्यालयातील साहित्याची मोडतोड करण्यात आली. पश्चिम बंगालचे शिक्षण मंत्री ब्रात्या बासू यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या घटनेत आपण लक्ष घालू, असे आश्वासन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ओएंड्रिलाच्या आईला दिले आहे.