पणजी-‘तहलका’चे संस्थापक संपादक तरुण तेजपाल यांच्याविरुद्ध गोवा पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात बलात्कार, लैंगिक शोषण व विनयभंगाचे आरोप लावण्यात आले आहे. गेल्या नोव्हेंबरमध्येगोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आपल्याच मासिकातील महिला पत्रकारावर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली तेजपाल सध्या कोठडीत आहेत. आरोप सिद्ध झाल्यास त्यांना कमाल सात वर्षांची शिक्षा होऊ शकते.
तपास अधिकारी सुनीता सावंत यांनी तेजपाल यांच्यावर कार्यालयीन पदाचा गैरवापर करून बलात्कार करणे ही कलमे लावण्यात आली आहेत.मुख्य न्यायदंडाधिकारी अनुजा प्रभुदेसाई यांच्याकडे 2,684 पानांच्या आरोपपत्रात पीडित, तहलकाचे कर्मचारी, तपास अधिकाºयांसह 152 जणांचे साक्षीजबाब आहेत. तेजपाल यांनी पीडितेवर बलात्कार, लैंगिक शोषण व विनयभंगाचा आरोप कबूल केल्याचे पुरावे आहेत.