आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्याच चित्रपटातून या अॅक्ट्रेसचा विदेशात बोलबाला, 11 वर्षांच्या मुलाची झाली पत्नी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तनीमाने सांकल या चित्रपटातून डेब्यू केले आहे. - Divya Marathi
तनीमाने सांकल या चित्रपटातून डेब्यू केले आहे.
जयपूर - राजस्थानमधील एका कथेवर आधारित चित्रपट सध्या विदेशातील अवॉर्ड फंक्शनमध्ये धूम करत आहे. आता पर्यंत या चित्रपटाने कित्येक अवॉर्ड जिंकले आहेत. 16 जुलैला मेलबर्नमध्ये होणाऱ्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलसाठी या चित्रपटाची निवड झाली आहे. 'सांकल' नावाच्या या चित्रपटात तनीमा भट्टाचार्यने डेब्यू केला आहे. चित्रपटात ती 11 वर्षांच्या मुलाची नवरी बनते. यासाठी तनीमाला अनेक अवॉर्ड मिळाले आहेत.

पहिल्याच चित्रपटाने झाले नाव
- एका मुलाखतीत तनीमाने सांगितले की तिच्या कुटुंबातील कोणीलाही चित्रपटांची पार्श्वभूमी नाही.
- सुरुवातीला तिला इंडियन आर्मी जॉईन करण्याची इच्छा होती.
- तनीमाने कोलकात्यातून कॉमर्समध्ये ग्रॅज्यूएशन केले, मात्र तिच्या भाग्यात काही वेगळेच लिहिलेले होते.
- सुरुवातीला तनीमाना बंगाली शॉर्ट फिल्ममध्ये काम केले होते. तिने काही अॅड आणि म्यूझिक व्हिडिओमध्येही काम केले आहे.
- तनीमा सांगते, चित्रपटाच्या कास्टिंगची जाहिरात एका पेपरमध्ये वाचली होती.
- त्यानंतर या चित्रपटात एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर म्हणून तिची निवड झाली होती.
- जेव्हा चित्रपटाच्या नायिकेचा शोध सुरु झाला तेव्हा डायरेक्टरने तिलाही ऑडिशन देण्यास सांगितले होते.
- डायरेक्टरला तिचा अभिनय आवडला आणि लीड रोलमध्ये ती झळकली.

चित्रपटासाठी राजस्थानच्या अनेक गावात फिरली
- चित्रपटाची कथा राजस्थानच्या जैसलमेर येथील एका छोट्या गावातील आहे.
- रोल समजून घेण्यासाठी तनीमा त्या गावातही गेली होती. तिथे तिने मुक्काम केला. तेथील महिलांशी संवाद साधला. त्या कशा बोलतात, राहातात याचा बारकाईने अभ्यास केला.
- तनीमा सांगते, की तिला सर्वाधिक त्रास ती भाषा समजून घेण्याचा झाला.

तनीमाने जिंकले कित्येक अवॉर्ड
- तनीमाने यूएसएमध्ये 'दी इंडी गॅदरिंगचा बेस्ट फिमेल लीड' चा अवॉर्ड जिंकला आहे.
- त्यासोबतच रशिया फिल्म फेस्टिव्हल आणि लखनऊचा शान ए अवधचा बेस्ट अॅक्ट्रेसचा अवॉर्ड पटकावला आहे.
काय आहे चित्रपटाची कथा, वाचा पुढील स्लाइडमध्ये..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...