आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टंटबाजी: शूटिंगदरम्यान 3 अॅक्टर्सनी हेलिकॉप्टरमधून तलावात घेतल्या उड्या, 2 बुडाले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु- दाक्षिणत्य सिनेमाच्या शूटिंगदरम्यान हेलिकॉप्टरमधून स्टंट सीन करताना तीन अॅक्टर्सनी तलावात उड्या घेेतल्या. यापैकी दोघेे तलावात बुडाल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून दोघांंचा शोध घेण्यात येत आहे. ‘मस्तीगुडी’ सिनेमाची शूटिंग सुरु असताना टिपागोंडानाहल्ली येेथील तलावाजवळ ही घटना घडली आहे.

अभिनेता दुनिया विजय हे मस्तीगुडीमध्ये लिड रोल करत आहे. ते सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. पण, दोघे जण बेेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे.

काय आहे हे प्रकरण?
- टिपागोंडानाहल्ली येेथील तलावाजवळ सोमवारी दुपारी पावणे तीन वाजेदरम्यान ही घटना घडली. अभ‍िनेता विजय आणि इतर दोघांना स्टंटदरम्यान हेलिकॉप्टरमधून तलावात उडया घेेतल्या.
- विजय पोहत काठावर आले. पण, राघव उदय आणि अनिल काठावर पोहोचलेच नाही. युद्धपातळीवर दोघांचा शोध घेतला जात आहे.
- राघव उदय आणि अनिल हे बुुडाल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. सिनेमाचे डायरेक्टर आणि प्रोड्यूसरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
- सूत्रांंनी दिलेली माहिती अशी की, शूटिंगच्या आधी क्रूने मोटर बोटची व्यवस्था केलेली नव्हती. धक्कादायक म्हणजे, या धोकादायक स्टंटच आधी कोणताही सराव करण्यात आला नव्हता.
राघव उदय अनेक सिनेमात दिसला व्हिलनच्या भूमिकेत...
- राघव उदय साउथ फिल्म इंडस्ट्रीतील धडाडीचा अभिनेता आहे. अनेक सिनेमात तो व्हिलनच्या भूमिकेत दिसला होता.
- अनिल बॉडी बिल्डर असून विजयचा निकटवर्तीय होता. अनेक सिनेमात त्याने विजयसोबत काम केले होते.

यापूर्वीही झाल्या आहेत अशा दुर्घटना...
- मल्याळम सिनेेमा अभिनेता जयन यांंचे 1980 मध्ये 'कोलिएक्कम’ची शूटिंग करताना निधन झालेे होतेे.
- 1973 मध्येे ‘गंधाडा’ सिनेेमाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता विष्णुवर्धन याने लोडेड रिव्हॉल्वरने सहयोगी अभिनेता राज कुमारवर गोळी झाडली होती. सुदैवाने तो वाचला.
- अमिताभ बच्चन यांना देखील 'कुली' सिनेमाच्या शु‍‍टींगदरम्यान गंभीर दुखापत झाली होती.

पुढील स्लाइडवर पाहा, घटनेचा व्हिडिओ आणि दुनिया विजय, राघव उदय आणि अनिल यांचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...