आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Miss Call वरुन झाले प्रेम, घरातून पळाले, तरुणी प्रेग्नंट, प्रदीर्घ ड्रामानंतर केले लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जितेंद्र आणि कंचन यांनी एकमेकांना हार घालून लग्न केले. - Divya Marathi
जितेंद्र आणि कंचन यांनी एकमेकांना हार घालून लग्न केले.
झाशी (उत्तर प्रदेश)- जिल्ह्यातील एका लहान गावामध्ये राहणाऱ्या तरुणीच्या मोबाईलवर काही महिन्यांपूर्वी मिस्डकॉल आला. एका तरुणाकडून हा कॉल आला होता. त्यानंतर दोघांमध्ये नियमित बोलणे होऊ लागले. दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. त्यानंतर तरुणी त्या मुलासोबत मुंबईला पळून गेली. टॅक्सी चालवून तरुणीने घराला हातभार लावला. नंतर दोघे दमन-द्वीपला स्थायी झाले. तरुणी प्रेग्नंट झाली. या दरम्यान तरुण तिला सोडून घरी परतला. त्यानंतर झालेल्या प्रदीर्घ नाट्यानंतर दोघांनी पोलिस ठाण्यात लग्न केले. अशी फिल्मी आहे या दोघांची कहाणी.
पहिले तक्रार नंतर प्रेम
- जितेंद्र असे तरुणाचे नाव आहे. त्याने गंमत म्हणून एका मोबाईल क्रमांकावर मिस्डकॉल दिला.
- कंचन गोस्वामी हिच्या मोबाईलवर हा कॉल आला होता. तिने कॉल बॅक केले. येथून तिचे आयुष्य बदलले.
- तिने विचारणा केली. त्यावर जितेंद्रने काही कारण दिले. दोघांमध्ये काही दिवस वादावादी चालली.
- दोघे एकमेकांना फोन करुन भांडायचे. काही दिवसांनी दोघांमध्ये सुसंवाद सुरु झाला.
- फोनवर सुरु झालेली फ्रेंडशीप प्रेमात बदलली.
बहिणीच्या सासरी जाण्याच्या बहाण्याने जितेंद्रला भेटली
- बहिणीच्या सासरी जायचे आहे असे कारण देऊन कंचन जितेंद्रला पहिल्यांदा झाशी स्टेशनवर भेटली.
- काही दिवस दोघे लपून छपून भेटत होते.
- त्यानंतर दोघांनी मुंबईला पळून जाण्याचा निर्णय घेतला.
पुढील स्लाईडवर वाचा.... जितेंद्र होता बेरोजगार, तिने चालवली टॅक्सी.... कंचना प्रेग्नंट करुन पळाला जितेंद्र.... पोलिस ठाण्यात लागले लग्न...
बातम्या आणखी आहेत...