आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिखांचा कत्ल-ए-आम करून काँग्रेसचे आता सहिष्णुतेवर व्याख्यान : नरेंद्र मोदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - ''मॅडम सोनियाजी, आज 2 नोव्‍हेंबर आहे. पण, 1984 मधील 2 नाव्‍हेंबर आजही आठवणीत आहे. इंदिरा गांधी यांची हत्‍या झाल्‍यानंतर शिखांचा कत्ल-ए-आम करण्‍यात आला. काँग्रेसवर गंभीर आरोप झालेत. आज या 2 नाव्‍हेंबरलाच काँग्रेस सहिष्णुतेवर बोलत आहे. परंतु, या दुर्घटनेमध्‍ये उद्ध्‍वस्‍त झालेल्‍या शीख कुटुंबीयांचे अश्रू अजूनही सुकले नाहीत. त्‍यामुळे काँग्रसने डुबून मरावे'', अशा शब्‍दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार) बिहारमधील पूर्णिया येथे आयोजित विधानसभा निवडणुकीच्‍या प्रचारसभेत काँग्रेसचा समाचार घेतला.
ते पुढे म्‍हणाले, ''पूर्णियातील प्रचारसभेला संबोधित करताना मोदी म्‍हणाले, ''आता हे मैदानाही छोटे पडत आहे तर काय करणार ? पूर्णियामध्‍ये यापेक्षा मोठे मैदान नाही. या ठिकाणी दूर दूर बसलेल्‍यांना मी दिसतही नाही. परंतु, ते मला आशीर्वाद देण्‍यास आले. यापेक्षा मोठे भाग्‍य काय असणार'', असे ते म्‍हणाले.

महिलांना जंगलराजची भीती
मोदी म्‍हणले, '' मी लोकसभा निवडणुकीच्‍या वेळी येथे आलो होतो. मात्र, त्‍यावेळी जी उणीव राहिली असेल ती दूर करण्‍याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी मोठ्या संख्‍येने आलेल्‍या माता-भगिनींना मी प्रणाम करतो. मला तर आर्श्‍चय वाटत आहे की, इतक्‍या मोठ्या संख्‍येने महिला या सभेला आल्‍यात. जंगलराजमुळे महिलांना सर्वाधिक त्रास होत आहे. त्‍यामुळेच आता महिला शांती आणि विकासासाठी मत देत आहेत.
मला 25 महिने झालेत यांना तर 25 वर्षे
''मला सत्‍तेत येऊन 25 महिने झाले आहेत. मात्र, हे लोक कामाचा हिशेब मागत आहेत. मागील 15 वर्षांत बिहारमध्‍ये लालू यांची सत्‍ता होती. नंतर 10 वर्षेत नितीश यांच्‍या खांद्यावर राज्‍याची धुरा आली. या 25 वर्षांचा हिशेब द्यायला ते तयार नाहीत. परंतु, मला 25 महिन्‍यांचा कामाचा हिशेब मागत आहेत'', असेही मोदी म्‍हणाले.