आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय बनावटीच्या ‘आयएनएस अरिहंत’वरील अणुभट्टी सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विशाखापट्टणम/नवी दिल्ली - आण्विक क्षमतेमध्ये भारताने आणखी एक यशस्वी पाऊल टाकले. संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘आयएनएस अरिहंत’मधील 83 मेगावॅट क्षमतेची अणुभट्टी सुरू करण्यात आली असून भारत आता जमीन, आकाश आणि पाण्यातही आण्विक हल्ले करू शकेल. आतापर्यंत अमेरिका, चीन, फ्रान्स, रशिया आणि ब्रिटन या पाच देशांकडेच ही क्षमता होती. अरिहंतला चाचणीसाठी पावसाळा संपल्यावरच समुद्रात उतरवले जाईल. भारताकडे सध्या रशियाकडून करार तत्त्वावर घेतलेली आयएनएस चक्र ही आण्विक पाणबुडी आहे.
अरिहंतमधील अणुभट्टीसह इतर चाचण्या दीड वर्ष चालतील. 26 जुलै 2009 रोजी या पाणबुडीचे जलावतरण झाले होते. देशाची ही दुसरी पाणबुडी.


आयएनएस अरिदमन : देशाच्या तिस-या आण्विक पाणबुडीची
निर्मिती सुरू.
44 किमी ताशी वेग
दिवस पाण्यात राहू शकते
सॅटेलाइट कम्युनिकेशन सपोर्ट सिस्टिम
किमी पल्ला असलेली बारा ‘के-15’ क्षेपणास्त्रे वाहुन नेण्याची क्षमता
3500 किमी मारक क्षमतेची चार ‘के-4’ क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची क्षमता