आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fine Of 85 Crore May Be On Asaram And Narayan Sai Rajasthan

बेहिशेबी गुंतवणुकीप्रकरणी आसाराम पुत्राला भरावा लागू शकतो 85 कोटींचा दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर- आश्रमातील दोन अल्पवयीन मुलींचे लैंग‍िक शोषण केल्याच्या आरोपावरून स्वयंघोषित आध्यात्मिक संत आसाराम आणि मुलगा नारायण साई तुरुंगाती हवा खात आहे. दुसरीकडे, प्राप्तीकर विभागाने नारायण साईवर दंडात्मक कारवाई करण्‍याची तयारी केली आहे. बेहिशेबी गुंतवणुकीप्रकरणी आसाराम पुत्रावर सुमारे 85 कोटी रुपयांचा दंड भरवा लागू शकतो.

आसाराम आणि नारायण साई बेहिशेबी गुंतवणूक केल्याप्रकरणी अडचणीत आले आहे. या प्रकरणाची चौकशी मुंबई प्राप्तीकर विभागातर्फे सुरु आहे. जोधपूर येथील पथक या कामात सहकार्य करत आहे.

नारायण साईने 2006- 07 मध्ये सुमारे 50 कोटी रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतविले होते. याबाबतचे सगळे पुरावे गुजरात पोलिसांकडे आहेत. प्राप्तीकर विभागाच्या सूत्रांनुसार नारायण साईने गुंतवणूक केलेल्या 50 कोटींवर व्याजासह 17 कोटी रुपयांचा कर थकीत आहे. याशिवाय दंडाची रक्कम ही कराच्या रकमेइतकी आहे. विशेष म्हणजे दंडाची रक्कम ही कराच्या तीन पटही आकारली जाऊ शकते. त्यामुळे नारायण साईला जवळपास 85 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जावू शकतो.

पुढे वाचा, आसारामप्रकरणी पाचही याचिका हायकोर्टाने फेटाळून लावल्या...