आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचारात तिरंग्याचा वापर केल्याबद्दल कुमार विश्वास यांना आयोगाचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेठी - उत्तर प्रदेशात अमेठीतून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींच्या विरोधात निवडणूक लढवत असलेले आम आदमी पार्टीचे उमेदवार तर्फे कुमार विश्वास यांच्याविरोधात काँग्रेसने दोन तक्रारी दाखल केल्या आहेत. प्रचारात तिरंग्याचा वापर केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने कुमार विश्वास यांना इशारा दिला आहे. यापुढे प्रचारात तिरंग्याचा वापर केल्याचे आढळले तर कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. कॉंग्रेस नेते मुन्ना सिंह यांनी कुमार विश्वास यांच्या विरोधात जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार जिल्हा प्रशानाने एका कविसंमेलनावरही बंदी घातली आहे. त्यात विश्वास हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते.