आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप खासदार रूपा गांगुली यांच्या विरुद्ध एफआयआर; बलात्कारावर केले होते असे विधान...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
कोलकाता - पश्चिम बंगालच्या भाजप खासदार तसेच अभिनेत्री रूपा गांगुली यांना बलात्कारावर केलेले वादग्रस्त विधान भोवले आहे. त्यांच्या विरोधात येथील पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर टीका करताना त्यांनी भाषेची मर्यादा ओलांडली होती. त्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण पेटले होते. 
 
 
काय म्हणाल्या होत्या?
पश्चिम बंगालमध्ये बलात्कार आणि महिला असुरक्षिततेच्या घटना वाढल्या असा दावा रूपा गांगुली यांनी केला होता. त्या शुक्रवारी म्हणाल्या, "त्यांच्या (तृणमूल कार्यकर्त्यांच्या) पत्न्या, मुलींना बंगालमध्ये पाठवा... पाहू त्या बलात्कार झाल्याशिवाय 15 दिवस तरी राहू शकतात का... त्यानंतरच मला बोला..." 
 
 
तृणमूलचा पलटवार
"समस्त राज्याला दोष देण्यापूर्वी त्यांनीच (गांगुली) एकदा सांगावे की पश्चिम बंगालमध्ये राहत असताना त्यांच्यावर कितीवेळा बलात्कार झाला आहे. यानंतरच त्यांच्या बोलण्यात खरे काय ते समोर येईल." असे प्रत्युत्तर राज्यातील मंत्री सोभनदेब चटोपाध्याय यांनी दिले.
 
 
भाजप प्रदेशाध्यक्षांचीही चौकशी
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केवळ रूपा गांगुलीच नव्हे, तर पोलिसांनी पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या विरोधातही चौकशी सुरू केली आहे. त्यांनी सुद्धा शुक्रवारी महिला अत्याचारावर कथित वादग्रस्त विधान केले होते.