आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तस्लिमा नसरीन यांच्यावर एफआयआर, ट्विटरवरून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - बांगलादेशच्या प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांच्या विरोधात बरेली पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ट्विटमधून इस्लाम धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
मौलाना सुबहान रजा खाँ मियाँ यांचा मुलगा हसन रजा खाँ नुरी मियाँ यांनी नसरीन यांच्या विरोधात तक्रार केली. सहा नोव्हेंबरला तस्लिमा यांनी केलेल्या ट्विटचा सारांश वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता. त्यात धार्मिक भावना दुखावणारी संज्ञा आहे, असे हसन यांनी म्हटले आहे. भारतात महिलांच्या विरोधात फतवा काढणार्‍या गुन्हेगारांना शिक्षा दिली जात नाही, असे तस्लिमा यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
मी ट्विटरवर जे काही बोलले आहे, ते सर्व खरे आहे. ट्विटरवर मी काय चुकीचे लिहिले, मला ठाऊक नाही; परंतु एवढे ठाऊक आहे की, ते लोक पुन्हा माझ्या मागे लागलेत, असे तस्लिमा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.