आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार, आप कार्यकर्त्यांना धक्काबुक्की

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर - भाजपप्रमुख अमित शहा यांना भेटण्यासाठी गेले असता भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या सदस्यांनी केला आहे. भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध त्यांनी पोलिसांत याची तक्रार दाखल केली आहे.
आप नेते अरविंद कटियार यांनी स्वरूपनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. ११ जुलै रोजी आप सदस्य शहा यांना भेटण्यास गेले. त्या वेळी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी शहा बैठक घेत होते. व्यापमं घोटाळ्याच्या चौकशीसाठी विशेष समिती गठित करण्याच्या मागणीचे निवेदन घेऊन आप सदस्य गेले होते.
मात्र, बैठकस्थळी भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचे कटियार यांनी तक्रारीत म्हटले आहे. आप कार्यकर्त्यांकडील रोख रक्कम, सोन्याची चेन हिसकावल्याचा आरोपही कटियार यांनी केला आहे. या बाचाबाचीत २ आप कार्यकर्ते जखमी झाले. दरम्यान, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक)चे जिल्हा अध्यक्ष अजय सिंह यांनीदेखील भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. स्थानिक समस्यांसंबंधी अमित शहा यांची भेट घेण्यास गेल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे अजय सिंह म्हणाले.