आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झारखंड: BJP अध्यक्षांनी अल्पवयिन मुलीला केले सून, मुलावर लैंगिक शोषणाचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ताला मरांडींचा मुलगा मुन्नाचे 27 जून रोजी लग्न झाले. - Divya Marathi
ताला मरांडींचा मुलगा मुन्नाचे 27 जून रोजी लग्न झाले.
रांची - भारतीय जनता पक्षाचे झारखंड प्रदेशाध्यक्ष ताला मरांडी यांच्या मुलावर लैंगिक शोषणाचा आरोप झाला आहे. गोड्डाचे पोलिस आयुक्त संजीव कुमार यांच्या आदेशावरुन शुक्रवारी मरांडी यांचा मुलगा मुन्ना याच्यावर बोआरीजोर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एकीकडे हा आरोप झाला असताना, दुसरीकडे मरांडी यांनी मुलाचे अल्पवयीन मुलीसोबत लग्न लावून दिल्याचा दुसरा आरोप होत आहे. चाइल्ड प्रोटेक्शन कमिशनने गोड्डाच्या जिल्हाधिकाऱ्यांना तीन दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री रघुवर दास यांनी मुन्नाच्या रिसेप्शनला जाण्याचा निर्णय रद्द केला आहे.

7 व्या वर्गात आहे मुन्नाची पत्नी
- ताला मरांडी यांचा मुलगा मुन्ना याचे 11 वर्षांच्या मुलीसोबत लग्न लावून दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
- भाजप प्रदेशाध्यक्ष मरांडी यांच्या मुलावर एका पाठोपाठ एक आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री दास यांनी मरांडी यांचा मुलगा मुन्नाच्या स्वागत सोहळ्याला उपस्थित राहाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
- 27 जून रोजी मुन्ना मरांडीचे लग्न झाले. गोड्डा जिल्ह्यातील बडा सिमरा गावातील भगन बास्की यांच्या मुलीसोबत त्याचे लग्न झाले होते.
- मुन्नाची नववधू महगामा एसडीएन शाळेत 7 व्या वर्गात असल्याचा खुलासा झाला आहे.
विरोधकांनी केली चौकशीची मागणी
- विरोधीपक्ष नेते हेमंत सोरेन यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.
- काँग्रेसच्या गोड्डा जिल्हा अध्यक्ष दीपिका पांडे यांनी राज्यपालांना पत्र लिहून या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

16 वर्षीय मुलीने केला लैंगिक शोषणाचा आरोप
- मुन्ना मरांडी याच्यावर खिजुरिया गावातील एका 16 वर्षीय मुलीने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
- पीडित मुलीने याप्रकरणी गोड्डाच्या जिल्हा सत्र न्यायालयात खटला दाखल केला आहे.
- मुलीचा आरोप आहे, की ताला मरांडी यांचा मुलगा मुन्ना दोन वर्षांपासून तिचे लैंगिक शोषण करत होता.
- जिल्हा सत्र न्यायालयाने पोलिस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहे. त्यानंतर पोलिस आयुक्त संजीव कुमार यांनी शुक्रवारी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.
महिला आयोगाने पोलिस महासंचालकांना लिहिले पत्र
- भाजप प्रदेशाध्यक्षाच्या मुलाने लैंगिक शोषण केलेल्या पीडित मुलीने महिला आयोगाचे दार ठोठावले आहे.
- मुलीची तक्रार मिळाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा महुआ माझी यांनी पोलिस महासंचालक डी.के. पांड्ये यांना पत्र लिहिले आहे.
- मरांडी यांच्या मुलाचे लग्न दुसऱ्याच एका मुलीसोबत ठरले होते. मात्र त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर त्या मुलीने लग्नाला नकार दिला.
- त्यानंतर घाईगडबडीत महगामा बरोबर त्याचे लग्न लावून देण्यात आले होते. आता ही मुलगी अल्पवयिन असल्याचे समोर आले आहे.