आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fir Registered Against Bollywood Actor Ranbir Kapoor And Farhan Akhtar At UP

बॉलिवूड अभिनेता रणवीर कपूर व फरहान अख्तरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- अभिनेता रणवीर कपूर व फरहान अख्तर)
नवी दिल्ली- बॉलिवूडमधील अभिनेता रणबीर कपूर व फरहान अख्तरला ऑनलाईन शॉपिंग साईटची जाहिरात करणे चांगलेच महागात पडले आहे. aksmebazar.com ची जाहिरात करून जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी लखनौमध्ये दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

लखनौ येथील केशव नगरमधील रहिवासी वकील रजत बन्सल यांनी मदियार पोलिस स्टेशनमध्ये फरहान आणि रणबीर विरोधात तक्रारीवरुन विश्वासघात व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

रजत बन्सल यांनी aksmebazar.com या ऑनलाइन शॉपिंग साईटवर एक एलईडी टीव्ही बुक केला होता. त्यासाठी रजत यांनी कंपनीला टीव्हीची किंमत 29,999 रुपये अदा केले होते. 10 दिवसांत टीव्हीची डिलिव्हरी करण्‍यात येईल, असे कंपनीने आश्वासन आले होते. परंतु, अद्याप रजत बन्सल यांनी बुक केलेला टीव्ही मिळाला नाही. कंपनीने आश्वासन पाळले नसल्याचे बन्सल यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. यामुळे बन्सल यांनी रणबीर, फरहानसोबतच askmebazar.com च्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सविरुद्ध गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.