आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कनार्टकचे माजी मुख्‍यमंत्री येदियुरप्पांच्या अडचणींत वाढ, जमीन वाटप प्रकरणी 2 एफआयआर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री तथा प्रदेश भाजपाध्यक्ष बी.एस. येदियुरप्पा यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दोन एफआयआर दाखल केले. मुख्यमंत्री असताना जमिनीसंबंधी अधिसूचना रद्द करण्याशी हे प्रकरण संबंधित आहे. शहर विकास विभागाच्या चार अधिकाऱ्यांचाही एफआयआरमध्ये समावेश आहे.
 
खासगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. अयप्पा यांच्या तक्रारीवरून हे एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. त्यात येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात बंगरूळूत डॉ. शिवरामा कारंत यांच्यासाठी संपादित जमिनीची अधिसूचना रद्द करण्यासाठी २० आदेश पारित केले होते. विशेष म्हणजे अधिसूचना समितीची परवानगी न घेता हा आदेश काढला होता, असा दावा अयप्पा यांनी केला आहे. अशाच प्रकारच्या अन्य एका प्रकरणात येदियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि आणखी एक महिना तुरुंगात काढावा लागला होता. १७ ऑगस्ट रोजी त्यांच्या विरोधात एसीबीने एफआयआर दाखल केला आहे. खरे तर काही दिवसांपूर्वीच येदियुरप्पा यांना आपल्या विरोधातील अनेक प्रकरणात दिलासा मिळाला होता. परंतु आता एसीबीच्या कारवाईने माजी मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली े.
 
२५७ एकरचे डिनोटिफिकेशन अंगलट : मुख्यमंत्री असताना येदियुरप्पा यांनी २५७ एकर संपादित जमिनीचे डिनोटिफिकेशन करण्याचे आदेश दिले होते. हेच प्रकरण त्यांच्या अंगलट आले आहे. गृहनिर्माण वसाहतीचे हे प्रकरण आहे.  त्यासंंबंधीचे आदेश बेकायदा असल्याचा याचिकाकर्त्याचा आरोप आहे. तत्पूर्वी जमिन मालकांकडून येदियुरप्पांकडे त्यासंदर्भात अर्ज आले होते. त्यानंतर त्यांनी भूसंपादन रद्द ठरवले होते. डोड्डाबालापूर व हेसरघट्टा दरम्यानच्या ३ हजार ५४६ एकरच्या संपादनाची अधिसूचना ३० डिसेंबर २००८ मध्ये जारी झाली होती. त्यापैकी अडीचशे एकर जमिनीचे अधिसूचना रद्द करण्यात आली होती. येदियुरप्पा यांच्या आदेशामुळे सरकारला सुमारे ३ हजार ८४५ कोटी रुपयांचा फटका बसल्याचा दावाही याचिकेतून करण्यात आला आहे.

अन्य चार जणांवरही गुन्हा
येदियुरप्पा यांच्यासह अन्य चार जणांवरही गुन्हा दाखल केला. तपास पूर्ण झाल्या नंतरच एसीबीने एफआयआर दाखल केला अाहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राजकीय सुडातून एफआयआर
भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून मला मुक्तता मिळाली आहे. मात्र, हा एफआयआर केवळ राजकीय सुडातून दाखल करणयात आला आहे, असा दावा येदियुरप्पा यांनी केला आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सत्ताधारी सिद्ध रमय्या सरकार सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचा आरोप अलीकडेच केला होता. त्याच्या दोनच दिवसांनंतर येदियुरप्पा यांच्यावर ही कारवाई झाल्याचे मानले जाते.
बातम्या आणखी आहेत...