आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • FIR Will Be Lodged Against Nitish Kumar And PK Shahi

चारा घोटाळ्यात लालूंना दिलासा; मिड-डे मील प्रकरणी नीतीशकुमारांवर गुन्हा?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा/छपरा- बिहाराचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. चारा घोटाळ्याप्रकरणी न्यायाधीश बदलण्याची लालूप्रसाद यादव यांची मागणी कोर्टाने मान्य केली आहे. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचे न्यायाधीश बदलण्याचेही संकेत दिले आहेत. तसेच लालूंबाबतचा निर्णय येत्या सहा ऑगस्टपर्यंत कोर्टाने राखून ठेवला आहे.

दुसरीकडे बिहारमधील छपरा जिल्हयातील गंडामन धर्मासती गावातील शाळेत कीटनाशक मिळसलेले मध्यान्ह भोजनामुळे 23 विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला होता. याप्रकरणी बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्यासह शालेय शिक्षणमंत्री पी.के.शाही यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे समजते.