आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानकडून 8 तास गोळीबार; घुसखोरीचा प्रयत्न फसला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - जम्मू़-काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यातील नौशहरा भागात असलेल्या लाम सेक्टरमध्ये लष्कराने नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांचा घुसखोरी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला.
 
पाकिस्तानकडून जवळपास ८ तास या सेक्टरमध्ये  ६ हून अधिक चौक्यांवर गोळीबार सुरू होता. यामध्ये कोणतेही नुकसान झालेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताकडून केलेल्या गोळीबारात पाकचे  चार सैनिक ठार आणि  तीन दहशतवादी मारले गेले. परंतु याला अधिकृत दुजाेरा मिळू शकला नाही. पाकिस्तानने सतत दुसऱ्याही दिवशी या भागात गोळीबार केला.
 
सकाळी ८ वाजता सेलाम सेक्टरमधील भारतीय चौक्यांना लक्ष्य करत गोळीबार सुरू होता. सुरुवातीला पाककडून लहान शस्त्रे वापरण्यात आली. त्यानंतर तोफगोळे  टाकण्यात आले. यादरम्यान तीन दहशतवादी पळून गेले. परंतु ते पळून जात असताना गोळीबारास बळी पडले. चार पाक सैनिकही भारताकडून झालेल्या गोळीबारात ठार झाल्याचे वृत्त आहे.   
 
शाळांना सुटी, लोकांमध्ये दहशत: सीमेवर भारत आणि पाक सैनिकांच्या गोळीबारामुळे या भागात दहशत पसरली आहे. लोक  दिवसभर घरातच लपून बसले होते. प्रशासनाकडून नियंत्रण रेषेवरील भागात असलेल्या शाळा बंद ठेवण्याच्या सूचना आल्या.  सतत दुसऱ्या दिवशी पाकिस्तानकडून या भागातील चौक्यांना लक्ष्य करून दहशतवाद्यांना घुसवण्याचा प्रयत्न हाेता.
बातम्या आणखी आहेत...