(फोटो : ही इमारत कोलकात्यातील सर्वात उंच इमारतींपैकी एक आहे.)
कोलकाता - मंगळवारी सकाळी कोलकात्याची सर्वात उंच इमारत चॅटर्जी इंटरनॅशनल बिल्डिंगमध्ये सकाळी 8.30 च्या सुमारास आग लागली. इमारतीच्या 12व्या आणि 15व्या मजल्यावर आग लागली होती. त्यामुळे तेथील लोकांना खाली येता येत नव्हते.
अग्निशमन दलाच्या जवानांचे लक्ष
आपल्याकडे जावे म्हणून या लोकांनी कागदाचे गोळे खाली फेकले. त्यापैकी चौघांना सुरक्षितपण बाहेर काढण्यात यश आले आहे. श्वासोच्छवासाला त्रास होत असल्याने या सर्वांना SSKM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पार्क स्ट्रीट येथील 24 मजल्यांच्या इमारतीमध्ये बहुतांश सरकारी कार्यालयेच आहेत. तसेच याठिकाणी काही घरेही आहेत. त्याठिकाणी काही लोक अडकलेले असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑफिस उघडण्याआधीच आग लागली असल्याने त्यात जास्त लोक अडकले असण्याची शक्यता नाही. मदत कार्याचा वेग वाढवता यावा यासाठी या रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 14 गाड्या प्रयत्न करत आहेत. तसेच चार हाइड्रॉलिक शिड्यांची मदतही घेतली जात आहे. इमारतीत अडकलेल्या लोकांची संख्या आणि आगीचे कारण याबाबत निश्चित माहिती अद्याप हाती आलेली नाही.
पुढे पाहा, घटनेचे PHOTO...