लखनऊ- किंग जॉर्ज मेडिकल यूनिव्हर्सिटीच्या (केजीएमयू) ट्रॉमा सेंटरमध्ये शनिवारी (15 जुलै) भीषण आग लागली. दुसर्या मजल्यावरील डिझास्टर मॅनेजमेंट वॉर्डला लागलेली ही आग क्षणात तिसर्या मजल्यावर पसरली. आगीनंतर शिफ्टिंगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक महिला आणि नवजात शिशूचा समावेश आहे.
पंतप्रधान योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहे. रविवारी सकाळी हॉस्पिटलमध्ये पोहोचून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
रात्री उशीरा आग आटोक्यात...
- डॉ. एसएन शंखवार यांनी सांगितले की, हॉस्पिटलच्या दुसर्या-तिसर्या मजल्याला आग लागली होती.
- एअरकंडीशरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- अग्निशमन दलाच्या 15-20 गाड्यांच्या मदतीने शनिवारी रात्री उशीरा आग आटोक्यात आणण्यात आली. हॉस्पिटलमधील अनेक मशिन्स आणि साहित्य आगीत जळून खाक झाले आहेत.
- आग आणि धुराचे लोट पाहिल्यानंतर हॉस्पिटलमध्ये चेंगराचेंगरी झाली. अनेक रुग्ण जीव वाचवण्यासाठी इकडून तिकडे धावत होते.
- जवळपास 150 रुग्णांना 8 वेगवेगळ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
व्हेंटिलेटरवर होते 37 रुग्ण
- आग लागली तेव्हा ट्रॉमा सेंटरमध्ये जवळपास 300 रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी 37 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. 100 हून जास्त रुग्णांना शताब्दी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. तसेच काही रुग्णांना गांधी वार्ड आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही रुग्णांचे बेड पार्किंगमध्ये लावण्यात आले आहे.
मृतांचे नावे....
- अरविंद गौतम (रा.तालकटोरा, लखनऊ)
- वसीम (रा.काकोरी, लखनऊ)
- सरस्वती
- मुकेश धवन
- नवजात शिशू
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..