आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेळगाव: बोअरवेलमधून निघत आहेत आगीच्या ज्वाळा, कोडं अजूनही कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेळगाव - बेळगाव जिल्‍ह्यातील सोरगाव परिसरातील एका शेतामध्‍ये असलेल्‍या बोअरवेलमधून चक्‍क आगीच्‍या ज्‍वाळा बाहेर येताना दिसत आहे. हा प्रकार लक्षात आल्‍यानंतर परिसरातील लोकांची शेतात गर्दी वाढली आहे. याबाबत सध्‍यातरी कमालीचे कुतूहल व्‍यक्‍त होताना दिसत आहे. भिमाप्पा गोलभावी यांच्या शेतातील हा प्रकार आहे.
भिमाप्पांच्या शेतातील बोअरवेल काही दिवसांपासून बंद होती. सध्‍या वाढलेल्या थंडीमुळे शेतकरी त्याशेजारीचं शेकोटी पेटवून बसले होते. दरम्‍याने अचानक या कूपनलिकेतून आगीच्या ज्वाळा बाहेर यायला लागल्‍या. हा प्रकार पाहून शेतकरी गोंधळून गेले. काहींनी या बोअरवेलवर भांडे ठेऊन भातही शिजवून पाहिला. काहींनी मक्‍याचे कणीस भाजून बोअरवेलमधून आगीच्‍या ज्‍वाळा बाहेर येत असल्‍याचे प्रात्‍यक्षिक दाखवले.
- हा प्रकार पाहून घाबरलेल्या शेतकऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.
- पोलिसांनी ही घटना जिल्हाधिकारी आणि भूगर्भखात्याला कळविली.
- प्रशासनाने प्रकरणाची प्रत्‍यक्ष पाहणी केली.
- भूगर्भ विभागाचे अधिकारी या घटनेमागचे कारण शोधत आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, बोअरवेलचे फोटो..