आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जयपूरमध्ये कोचिंग सेंटरच्या इमारतीला लागली आग, बेसमेंटमध्ये अडकले 150 विद्यार्थी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- जयपूर शहरातील बापू नगरातील एका कॉचिंग सेंटरच्या इमारतीला बुधवारी आग लागली. 150 पेक्षा जास्त विद्यार्थी बेसमेंटमध्ये अडकल्याची माहिती सूत्रांनी दिली. सकाळी 11.30 वाजता ही घटना घडली. शॉर्ट सर्किट झाल्या कारणामुळे ही आग भडक्याचे समजते. अग्‍िनशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

म‍िळालेल्या माहितीनुसार, आग लागलेल्या इमारतीत दोन कोचिंग क्लासेस चालतात. आग लागली तेव्हा इमारतीच्या बेसमेंटमध्ये जवळपास 150 पेक्षा जास्त विद्यार्थी होते. बेसमेंटमध्ये सर्वत्र धुर पसरल्याने काहींना गुदमरल्यासारखे वाटत होते. त्यामुळे काहींनी बेसमेटच्या काचा फोडल्या.

मोठी हानी टळली... जीवितहानी नाही.
आगीची सूचना मिळताच पोलिस आणि अग्निशमनदलाचे जवान तत्काळ घटनास्थळी पोहोचले. वीज कर्मचारीही घटनास्थळी हजर झाले. वीज कनेक्शन कट केल्यानंतर अग्निशमनदलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. बेसमेटमध्ये अडकेल्या विद्यार्थी-विद्यार्थिंनीना बाहेर काढले.
जिल्हाधिकारी पोहोचले घटनास्थळी; चौकशीचे आदेश...
पोलिस कंट्रोल रूममधून आगीची सूचना मिळताच जिल्हाधिकारी कृष्ण कुणाल हे घटनास्थळी पोहोचले. अतिरिक्त पोलिस आयुक्त विशाल बंसल, विपिन पांडे आणि डीसीपी अमनदीप सिंह कपूर घटनास्थळी पोहोचले. कृष्ण कुणाल यांनी आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
(Photos by: Yogendra Gupta & Vishnu Sharma)
आगीची भीषणता पाहाण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्‍सवर...
(फोटो: आग लागल्यानंतर कोचिंग सेंटरमधून बाहेर पडताना विद्यार्थी. )