आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: हिमाचलमधील सर्वात जुने मंदिर आगीत खाक, पांडवांनी उभारले होते मंदिर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिमला - ऐतिहासिक गाव शांघडमध्ये भीषण आग लागल्याने शंगखचूल महादेवाचे पांडवकालीन मंदीरासोबत तीन घरे जळाली आहे. तसेच महामाई जोगनी मातेचे मंदीरसुध्दा जळून राख झाले आहे.
शंगचूल महादेवाच्या या प्राचीन मंदीरात 20 अष्टधातूंच्या मुर्त्या होत्या त्या सुध्दा जळाल्या आहेत. ही आग मध्यरात्री लागली आहे. आग लागल्यानंतर जळण्याच्या आवाजाने जेव्हा लोकांची झोपमोड झाली, तेव्हा मंदिरासमवेत घरांनीसुध्दा आग पकडली होती. लोकांनी घरसोडून मंदिराची दारे तोडून देवाची मुर्ती आणि मोहरे तसेच इतर अलंकार वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत आग संपूर्ण मंदिरात पसरली होती. पुजाऱ्याच्या घरी काही दिवसांपासून असलेला बराजमान देवाच्या रथालाच लोकांना वाचवणे शक्य झाले.
13 कुटूंब झाली बेघर
या दुर्घटनेत देवासमवेत 18 कुटुंब बेघर झाले आहेत. लोकांनी आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र काष्ठकुणी शैलीने बनलेली घरे त्यांना वाचवणे शक्य झाले नाही. आग एवढी भयानक होती की, अष्टधातूच्या मुर्ती, सोन्याच्या तीन मोहरी, तीन चांदीच्या मुर्त्या, चार चांदीचे छत्र, एक सोन्याचे छत्र, चांदीची मझाणी, चांदीचे सामान, संपूर्ण पुजेचे सामान आणि इतर वस्तू आणि 20 लाख रुपयांची रोकड जळून राख झाली. या दुर्घटनेत ज्यांची घरे जळाली त्यांना प्रशासनाने 10-10 हजार रुपयांची मदत केली आहे.
मागील वर्षीच 35 लाख रुपये खर्च करून केला होता मंदिराचा जिर्णोध्दार
आगीत जळून राख झालेले शंगचूल देवतेच्या मंदिराचे जिर्णोध्दार पाच महिन्यांपूर्वीच झाले होते. जवळपास 35 लाख रुपये या मंदिरावर खर्च करण्यात आले होते.

पुढील स्लाईडवर पाहा, या दुर्घटनेचे इतर फोटो...