आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकचा तिसऱ्यांदा गोळीबार; भारतीय जवानांकडून तणाव टाळण्याचे प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - पाकिस्तानी लष्कराकडून रविवारी पुन्हा आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार करण्यात आला. मागच्या २४ तासांतील ही तिसरी घटना आहे. प्राप्त माहितीनुसार, पाकिस्तानी जवानांनी आरएसपुरा सेक्टरच्या तवी भागातील भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. मात्र, भारतीय जवानांनी त्यास प्रत्युत्तर देणे टाळले.
रविवारी अॅडिलेडमध्ये भारत-पाकदरम्यान विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामना होता आणि याचदरम्यान पाककडून हे कृत्य करण्यात आले. या भागात सीमा सुरक्षा दलाची १२७ तुकडी तैनात आहे. गोळीबाराच्या आडून पाककडून घुसखाेरी करण्यात आल्याच्या संशयावरून नंतर लष्कराने या भागात शोधमोहीम राबवली. तत्पूर्वी शनिवारी आरएसपुरात चौकीवर उखळी तोफांचा मारा केला होता.